बॅंकांमध्ये ७१ हजार कोटींहून जास्त रकमेचे घोटाळे 

बॅंकांमध्ये ७१ हजार कोटींहून जास्त रकमेचे घोटाळे 

नागपूर - राष्ट्रीयीकृत बॅंकांत २०१७-१८ व २०१८-१९ च्या पहिल्या दोन तिमाहीसह एकूण दीड आर्थिक वर्षात देशातील विविध बॅंकांमध्ये ७१ हजार ६८० कोटींहून अधिक रकमेचे घोटाळे झाले. घोटाळ्यांची संख्यादेखील ६७ हजारांहून अधिक असल्याचे उघड झाले आहे. माहिती अधिकारी कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी आरबीआयला विचारलेल्या माहिती  अधिकारात विचारणा केल्यानंतर ही खळबळजनक आकडेवारी पुढे आली आहे.  

२०१७-२०१८ ते २०१८ -२०१९ या काळात देशातील वाणिज्यिक बॅंकांमध्ये किती आर्थिक घोटाळे झाले, वर्षानुसार आकडेवारी विचारण्यात आली होती. त्यानुसार एक एप्रिल २०१७ ते २०१८-२०१९ च्या पहिल्या दोन तिमाहीमध्ये एकूण ६७ हजार  ५०७ गैरप्रकार उघडकीस आले. यात राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बॅंकांमध्ये झालेले प्रत्यक्ष घोटाळे किंवा आर्थिक फसवणूक यांचा समावेश होता. यात राष्ट्रीयीकृत बॅंकेत ७१ हजार ६८० कोटी रुपयांच्या रकमेचा समावेश होता. बॅंक फसवणूक प्रकरणी ३६ कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. देशात  नोटाबंदीनंतर विविध बॅंकांमध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीत वाढ झाल्या आहेत.

नवोदयसह १९ बॅंकांचे परवाना रद्द
एक जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत १९ नागरिक सहकारी बॅंकांचे परवाने रद्द केले. त्यात नागपूरच्या नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचा समावेश आहे. शहरी सहकारी बॅंकेत एक जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत  १२९ फसवणुकीची प्रकरणे आरबीआयकडे प्राप्त झाली. यामध्ये एकूण ८६.९७ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे. श्रीस्वामी समर्थ अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड नळदुर्ग, विठ्ठल नागरी सहकारी बॅंक लातूरसह इतरही बॅंकांचा समावेश आहे. वर्षभरात सहकारी बॅंकांमध्ये ३१ कोटींचे घोटाळे शहरी सहकारी बॅंकांमध्ये एक जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत सप्टेंबर २०१९  या वर्षभरात १२९ घोटाळे झाले. घोटाळ्यांची रक्कम ८६ कोटी ९७ लाख इतकी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com