मॉर्निंग अन् इव्‍हिनिंग वॉकही गुन्हा 

3.jpg
3.jpg

अकोला  ः कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. असे जरी असले तरी अकोलेकर मात्र, या लॉकडाऊनला मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकला बाहेर निघून हरताळ फासत असल्याचे चित्र आहे. तेव्हा लॉकडाऊनच्या या काही दिवसांत मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकसाठीही नका न निघू बाहेर अशी म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र, अशा नागरिकांवर आता पोलिसांनी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरातील काही ठराविक ठिकाणी लॉकडाऊनच्या काळातही काही अकोलेकर शहरातील पीकेव्ही, गौरक्षण रोड, जठारपेठ चौक रोड, उमरी परिसर, गीतानगर, मोर्णा नदी पूल, सरकारी बागिचा, आरटीओ रोड या परिसरात सकाळी-सायंकाळी वॉकसाठी बाहेर निघत आहेत. मात्र, यावेळी बाहेर निघणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने एकमेकांच्या संपर्कात आल्याने या विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा अशा व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई करून गुन्हे दाखल करण्यची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन संपण्याचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, नागरिकांनी काही दिवस तरी कळ सोसावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. शहरात नागरिक पहाटे मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडतात. एकत्र जमतात आणि गप्पांचा फड रंगवतात. ही बाब पोलिसांच्या लक्षात यावी. या बाबीची गंभीर दखल घेत ऑलआऊट मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी देण्याची गरज निर्माण झाली आहे.

आता कायदेशीर कारवाई
ऑल आऊट मोहिमेच्या पहिल्या दिवशी केवळ समज देऊन नागरिकांना सोडून देण्यात येत आहे. मात्र, आता कुणी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर आल्यास थेट कायदेशीर कारवाई करण्यात यायला हवी. नागरिकांनी घरातच रहावे, यासाठी पोलिस प्रशासन आणखी आक्रमक होणे गरजेचे आहे.

ज्या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी वॉकसाठी लोक बाहेर निघत आहेत अशांवर लक्ष ठेवले जाईल. सकाळी सायंकाळी असे लोक आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
-अमोघ गावकर, जिल्हा पोलिस अधीक्षक, अकोला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com