मोर्शीला विषाणुजन्य तापाचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

मोर्शी (जि. अमरावती) :  शहरात तसेच तालुक्‍यात विषाणुजन्य तापाने थैमान घातले असून, मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालये रुग्णांनी तुडुंब भरली आहेत. मात्र औषधोपचार व विविध सोयीसुविधांच्या पार्श्‍वभूमीवर येथील उपजिल्हा रुग्णालय पांढरा हत्ती ठरत आहे.

मोर्शी (जि. अमरावती) :  शहरात तसेच तालुक्‍यात विषाणुजन्य तापाने थैमान घातले असून, मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालये रुग्णांनी तुडुंब भरली आहेत. मात्र औषधोपचार व विविध सोयीसुविधांच्या पार्श्‍वभूमीवर येथील उपजिल्हा रुग्णालय पांढरा हत्ती ठरत आहे.
उशिरा आलेल्या मॉन्सूनने अवघ्या विदर्भात धुमाकूळ घातला आहे. परिणामी वातावरण बदलामुळे रोगराई पसरली आहे. मोर्शी परिसरात विषाणुजन्य तापाने थैमान घातले असून टायफाईड, मलेरिया, डेंगीसारख्या आजारांची सर्वत्र साथ आली आहे. प्रत्येक घरात रुग्ण दिसत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दररोज 600 ते 700 रुग्ण येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कोरडे यांनी दिली. त्यासोबतच येथील खासगी रुग्णालयांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत असून शासकीय रुग्णालयांमध्ये अपेक्षित सोयीसुविधा नसल्यामुळे ग्रामीण भागातील गरीब लोकांची हेळसांड होत असल्याचे चित्र दिसत आहे. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सात पदांपैकी केवळ काही डॉक्‍टर उपलब्ध असून सातपैकी दोन डॉक्‍टरांनी राजीनामा दिलेला आहे, तर उर्वरित तीन डॉक्‍टर कित्येक दिवसांपासून सेवेत रुजू झालेले नसल्याचे समजते. शासकीय रुग्णालयांमध्ये औषधसाठा बऱ्यापैकी असूनसुद्धा तांत्रिक कर्मचारी कमी असल्याने रुग्णांची धावपळ होत आहे. त्यामुळे रिक्त जागा त्वरित भरण्याची मागणी जनसामान्यांकडून होत आहे. शासकीय रक्तपेढीची रक्त साठवणुकीची मर्यादा फारच कमी असल्याने केवळ एक बॉटल रक्ताकरिता रुग्णांना अमरावतीला धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morsi has a feverish fever