डेंगीने घेतला मुलाचा बळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

डेंगीने घेतला मुलाचा बळी
नागपूर : शहरातील मोकळ्या भूखंडांवरील वाढलेले झुडपं, गळती लागलेली सिवेज लाइन्स, रस्त्यांवरील खड्ड्यातील साचलेले पाणी त्यामुळे शहरात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. एका 15 वर्षीय मुलाचा डेंगीने बळी घेतला असून, महापालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर उठले आहे.

डेंगीने घेतला मुलाचा बळी
नागपूर : शहरातील मोकळ्या भूखंडांवरील वाढलेले झुडपं, गळती लागलेली सिवेज लाइन्स, रस्त्यांवरील खड्ड्यातील साचलेले पाणी त्यामुळे शहरात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. एका 15 वर्षीय मुलाचा डेंगीने बळी घेतला असून, महापालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर उठले आहे.
शहरातील अस्वच्छतेमुळे साथीच्या रोगाने तोंड वर केले आहे. साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी उपाययोजनांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने घराघरांत मलेरिया, डेंगीचे रुग्ण आहेत. या डेंगीने शहरातील बिडीपेठ भागातील पात्रीकर दाम्पत्याच्या एकुलत्या एक मुलाचा बळी घेतला. कन्हैया पात्रीकर असे डेंगीने बळी घेतलेल्या मुलाचे नाव आहे. तो दहावीचा विद्यार्थी होता. एका खासगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू डेंगीमुळे झाल्याचे परिसरातील नागरिक तसेच नगरसेवक नागेश सहारे यांनी नमूद केले. बिडीपेठमधील पात्रीकर यांचे शेजाऱ्यांनी परिसरात घाण, अस्वच्छता असल्याचे नमूद केले. पात्रीकर यांच्या घरामागेच एका इमारतीचे बांधकाम सुरू असून, घरापुढे मैदानावर नागरिक कचरा फेकत असल्याचे सांगितले. इमारत बांधकाम परिसरात औषधाची फवारणी तसेच मैदानावरील कचरा स्वच्छ करण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे. मात्र, महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे नमूद करीत या परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.
सात रुग्ण पॉझिटिव्ह
गेल्या काही दिवसांत शहरातील 46 जणांची तपासणी करण्यात आली. यातील 7 जण डेंगीचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे मनपाच्या हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे यांनी नमूद केले.

Web Title: mosquito killed child

टॅग्स