दोन वर्षांत वाघांच्या हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू; विदर्भात ३८ जणांचा बळी

Most deaths in tiger attacks in two years Tiger story
Most deaths in tiger attacks in two years Tiger story

नागपूर : टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिक घरात बसले असताना वन्यप्राण्यांचे स्थलांतर वाढले आहे. वन्यजिवांचा मुक्काम गावाच्या जवळ असल्याने गेल्या दोन वर्षांत एकूण ९० नागरिक हल्‍ल्यात ठार झाले आहेत. यापैकी सर्वाधिक मृत्यू वाघांच्या हल्ल्यातील आहेत.

कोरोना काळात नागरिकांचाही जंगलातील वावर वाढला. परिणामी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मानवाच्या मृत्यूत विक्रमी वाढ झाली. मागील दोन वर्षांच्या एकत्रित आकडेवारीपेक्षा मानव-वन्यजीव संघर्षात सर्वाधिक ९० नागरिकांनी जीव गमावले आहेत. त्यातील सर्वाधिक ३७ मृत्यू वाघाच्या हल्ल्यातील असून, चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक २६ जणांचे जीव गेले आहेत. या सर्वांना प्रत्येकी १५ लाख रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

राज्यात गेल्या वर्षी झालेल्या व्याघ्र गणनेत ३० टक्के वाघ तर ४० टक्के बिबट्यांची संख्या वाढलेली आहे. तसेच विविध प्रकल्प, विकासकामांमुळे वन्यजिवांचा अधिवास कमी होत असल्याने मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. २०१८ आणि २०१९ या वर्षात अनुक्रमे ३६ आणि ३२ जणांचे मृत्यू झाले होते. त्यातूलनेत हा आकडा ६० टक्क्यांनी वाढलेला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात अंदाजे १८५ पेक्षा अधिक वाघ असून, बिबट्याची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या परिसरात कायम मानव-वन्यजीव संघर्ष होत असतो. त्यामुळे राज्य सरकारने येथील वाघिणीची नसबंदी करण्याचा प्रस्तावही पुढे आला होता.

मात्र, स्वयंसेवी संस्था व राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत यावर विरोध झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभ्यास करून त्यावर योग्य निर्णय घेण्यात यावा, अशा सूचना दिल्या. त्यामुळे हा विषय मागे पडला असला तरी वाघांची संख्या वाढू लागल्याने मानव-वन्यजीव संघर्ष वाढू लागला आहे.

विदर्भात वाघ, बिबट, अस्वल व इतर वन्यजीव अधिक असल्याने वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक ३८ त्यापाठोपाठ ३० बिबट्याच्या हल्ल्यात जणांचे जीव गेलेत. अस्वल ०५, रानडुक्कर ०६, गवा ०२, नीलगाय ०२, लांडग्याच्या हल्ल्यात दोन जणांना जीव गमवावे लागले.

हल्ल्यांबाबत विचारविनिमयही करण्यात येईल
कोविडमुळे सर्वत्र शांतता पसरली होती. त्यामुळे प्राणी बाहेर आल्यानंतर ते पुन्हा आपल्या अधिवासात जाताना हे हल्ले झाले असावेत असा अंदाज आहे. तसेच याबाबत विचारविनिमयही करण्यात येईल. 
- नितीन काकोडकर,
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

आकडेवारी बोलते 

  • वाघाच्या हल्ल्यात मृत - ३८
  • चंद्रपूर २७
  • गडचिरोली ५
  • नागपूर ५
  • यवतमाळ १ 
वर्ष मृत्यू मदत 
२०१६   ५३   ४,२४,००,००० 
२०१७   ५० ४,००,००,००० 
२०१८ ३६ ४.०६,००,००० 
२०१९ 32 ५,४०,००,००० 
२०२०   ९०   १३,००,००,०००

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com