नागपुरातून सर्वाधिक "आरटीई' अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

नागपूर - राईट टू एज्युकेशन (आरटीई)च्या बाबतीत सर्वाधिक जागरूक नागपुरातील पालक आहेत. राज्यभरात सर्वाधिक अर्ज नागपूर जिल्ह्यात दाखल झाले असून हे प्रमाण एकूण जागेच्या 226 टक्के आहे. विभागाच्या प्रयत्नाचे हे यश असल्याचे दिसते. 

नागपूर - राईट टू एज्युकेशन (आरटीई)च्या बाबतीत सर्वाधिक जागरूक नागपुरातील पालक आहेत. राज्यभरात सर्वाधिक अर्ज नागपूर जिल्ह्यात दाखल झाले असून हे प्रमाण एकूण जागेच्या 226 टक्के आहे. विभागाच्या प्रयत्नाचे हे यश असल्याचे दिसते. 

आरटीईच्या नियमानुसार 25 टक्के जागा शाळांना आरक्षित ठेवण आवश्‍यक आहे. राज्यभरात 9194 शाळांची आरटीईअंतर्गत नोंदणी झाली असून राज्यात 1,16,818 इतक्‍या जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहे. राज्यात सर्वाधिक 16,619 जागा पुणे जिल्ह्यात आरक्षित ठेवण्यात आल्या आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात13400 तर तिसऱ्या क्रमांकावर नागपूर असून जिल्ह्यात 7204 जागा आरटीईअंतर्गत आरक्षित ठेवण्यात आल्या आहे. पण आरटीईला पालकांचा सर्वाधिक प्रतिसाद नागपूर जिल्ह्यात मिळतो आहे. 7204 जागांसाठी मंगळवारपर्यंत नागपुरात 16308 पालकांनी अर्ज केले होते. पुण्यात 16619 जागेसाठी 29183 पालकांनी अर्ज केले. तर ठाण्यात 13400 जागेसाठी 8411 पालकांनी अर्ज केले आहे. सर्वांत मागे पालघर जिल्हा आहे. येथे 4252 जागा असून फक्त 541 अर्ज आले आहे. 

आरटीईअंतर्गत नामांकित शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पालकांना मोफत शिक्षण उपलब्ध होते. त्यामुळे मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी पालकांचाही आरटीईकडे कल वाढलेला आहे. गेल्यावर्षीसुद्धा नागपुरातून सर्वाधिक आरटीईचे अर्ज आले होते. 

जिल्हानिहाय जागा आणि अर्ज 
जिल्हा जागा अर्ज टक्केवारी 
नागपूर 7204 16308 226 
पुणे 16619 29183 176 
मुंबई 6265 5863 94 
अमरावती 2537 4155 164 
औरंगाबाद 5627 6716 119 
पालघर 4252 541 13 
कोल्हापूर 3567 805 23 

Web Title: Most RTE applications from Nagpur