यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी ४६ शुभ मुहूर्त; तुळशी विवाहानंतर उडणार लग्नाचे बार
गतवर्षी गुरूचा आस्त असतानाही ८६ मुहूर्त होते. मात्र, यावर्षी गुरू अस्त लग्नसराईत आल्यामुळे ४६ मुहूर्त आहेत. यंदा कर्तव्य असणाऱ्या घरात दिवाळीपेक्षा लग्नसराईत घाई बघायला मिळणार आहे. यंदाच्या वर्षात गतवर्षीपेक्षा मुहूर्त कमी असल्यामुळे लग्नकार्यासाठी मंगलकार्यालय मिळवणे अवघड ठरणार आहे.
आर्णी (जि. यवतमाळ) : तुळशी विवाह झाल्यानंतर लगीन घाईचे दिवस सुरू होतात. यंदा २० नोव्हेंबरपासून विवाहसाठी मुहूर्त सुरू होणार आहे. हे मुहूर्त जून २०२१ पर्यंत चालणार आहेत. म्हणजेच आठ महिन्यांच्या काळात ४६ लग्नतीथी आहेत. मे महिन्यात सर्वाधिक मुहूर्त असल्याने हा महिना लग्नाच्या धामधुमीचा ठरणार आहे.
दिवाळी सण झाल्यानंतर तुळशी विवाहाला प्रंरभ होतो. ८ नोव्हेंबरला तुळशी विवाह आहे. यावर्षी तुळशी विवाहानंतर तब्बल ९ दिवसांनी विवाह मुहूर्त प्रंरभ होणार आहे. तसेच यावर्षी डिसेंबर महिन्यापासून गुरूचा अस्त असल्यामुळे महिनाभर शुभ मुहूर्त राहाणार नाहीत. यंदा नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत एकूण ११ मुहूर्त असल्याचे वधू-वर पित्याची आतापासूनच लगीनघाई सुरू झाली आहे.
सविस्तर वाचा - टूथपेस्ट'वरील रंगीत पट्ट्यांचा अर्थ तरी काय?
गतवर्षी गुरूचा आस्त असतानाही ८६ मुहूर्त होते. मात्र, यावर्षी गुरू अस्त लग्नसराईत आल्यामुळे ४६ मुहूर्त आहेत. यंदा कर्तव्य असणाऱ्या घरात दिवाळीपेक्षा लग्नसराईत घाई बघायला मिळणार आहे. यंदाच्या वर्षात गतवर्षीपेक्षा मुहूर्त कमी असल्यामुळे लग्नकार्यासाठी मंगलकार्यालय मिळवणे अवघड ठरणार आहे. त्यासाठी आतापासूनच मंगलकार्य मिळवण्यासाठी घाई करण्यात येत आहे. तसेच लग्नघाईची तयारी ही मोठ्या प्रमाणात करण्यासाठी धावपळही होणार आहे.
अशा आहेत लग्नाच्या तारखा
महिना | विवाह मुहूर्ताच्या तारखा |
नोव्हेंबर | २०, २१, २३, २८ |
डिसेंबर | १, २, ३, ६, ८, ११, १२ |
जानेवारी | १८, २०, २९, ३०, ३१ |
फेब्रुवारी | १, ४, १२, १४, १६, २०, २७ |
मार्च | ३, ४, ८, ११, १२, १९ |
एप्रिल | १५, १६, २६, २७ |
मे | २, ५, ६, ८, १२, १४, १७, १८, १९, २४ |
जून | ११, १४, १५ |
संपादन - नीलेश डाखोरे