माता बालसंगोपन केंद्र "व्हेंटिलेटरवर'

सतीश घारड
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

टेकाडी (जि. नागपूर) :  ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या माता बालसंगोपन केंद्राची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात छताला गळती लागत असून, तुटलेले दरवाजे, फाकलेल्या भिंती, लोखंडी पलंग सभोवताल असलेल्या अस्वच्छतेमुळे केंद्रच "व्हेंटिलेटरवर' आले आहे. इमारतीच्या भग्नावस्थेमुळे रुग्णही यायला तयार नाही. मात्र, याकडे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. 

महिलांच्या आरोग्यासाठी टेकाडी येथील माता बालसंगोपन उपकेंद्रात आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, मदतनीस, पर्यवेक्षक असे कर्मचारी कार्यरत आहे. साधारणतः सन 1993-94 पर्यंत याच केंद्रामध्ये सुचारू स्वरुपात प्रसूती होऊन सुविधांचा लाभ मिळत होता. सरकारच्या आरोग्यासंबंधी विविध सवलती व योजना महिला आणि बालकांना मिळत होत्या. परंतु, उपकेंद्राची इमारत जीर्ण झाली आहे. पावसाठ्यात छताला गळती लागते. इमारतीच्या आतील तुटलेले लाकडी काम, रुग्णांची होणारी हेळसांड आदी कारणांमुळे केंद्र नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या समस्यांमुळे पूर्वीसारख्या प्रसूती केंद्रावर करणे शक्‍य नाही. तसेच कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागते. केंद्राची दुरवस्था झाल्याने रुग्णसेवा कोलमडली आहे. संबंधित विभागाने केंद्राकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother Child Care Centers "On Ventilators"