दोन चिमुकल्यांसह आईची रेल्वेखाली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

चांदूररेल्वे, (जि. अमरावती) : शहरातील रहिवासी एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह रेल्वेसमोर उडी घेतली. यामध्ये तिघांचाही करुण अंत झाला. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (ता. 11) मध्यरात्रीनंतर रेल्वेक्रॉसिंगजवळ घडली. मंगळवारी सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेने समाजमन सुन्न झाले.
दुर्गा शेखर रामटेके (वय 27), पियू (वय 5) व एक वर्षाचा मुलगा (रा. भीमनगर), अशी मृत मायलेकांची नावे आहेत. दुर्गा रामटेके या पती शेखर, मुलगी पियू व मुलासह भीमनगर येथे वास्तव्यास होत्या. शेखर व दुर्गा यांचा प्रेमविवाह झाला होता, अशी माहिती आहे.

दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास दुर्गा रामटेके या त्यांच्या दोन चिमुकल्यांसह रेल्वेक्रॉसिंगवर गेल्या. येथे त्यांनी दोन्ही चिमुकल्यांना कमरेला बांधून मालगाडीसमोर उडी घेतली. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला. मंगळवारी (ता. 12) सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. बडनेरा रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस. डी. वानखडे यांच्या नेतृत्वात पीएसआय राजू रंगारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दुर्गा रामटेके यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास सुरू आहे.

Web Title: mother commited suicide with kids