शॉक लागून सासू-सुनेचा मृत्यू

dead
dead

कुंभा (यवतमाळ) : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील कुंभा येथे विजेचा शॉक लागुन सासु सुनेचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी सात दरम्यान घडली.

सुनिता मोहुर्ले आणि शकुंतला मोहुर्ले असे या दुर्दैवी महिलांचे नाव आहे . घरासमोर बांधलेल्या तारेवरचे वाळत टाकलेले कपडे काढायला गेलेल्या सुनीताला तारेत विद्युत प्रवाह असल्याने जोराचा धक्का लागला. तिला वाचवायला तिची सासु शकुंतला गेली असता त्यांनाही विजेचा शॉक लागला. या दोघांना वणी ग्रामीण रुग्णालयात तातडीने नेण्यात आले, पण दुर्दैवाने रुग्णालयात दाखल करण्याच्या आधीच या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कुंभा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com