जावयाची सासरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

अमरावती: तीन महिन्यांपूर्वी लग्न झाल्यानंतर कौटुंबिक कारणामुळे पतीपत्नीमध्ये वाद झाल्यावर पत्नी माहेरी आली. विनंती करूनही माहेरच्यांनी सोबत पाठविण्यास नकार दिला. त्यामुळे पतीने पत्नीच्या माहेरीच तिच्या घरासमोर जाळून घेऊन आत्महत्या केली.

अमरावती: तीन महिन्यांपूर्वी लग्न झाल्यानंतर कौटुंबिक कारणामुळे पतीपत्नीमध्ये वाद झाल्यावर पत्नी माहेरी आली. विनंती करूनही माहेरच्यांनी सोबत पाठविण्यास नकार दिला. त्यामुळे पतीने पत्नीच्या माहेरीच तिच्या घरासमोर जाळून घेऊन आत्महत्या केली.
सचिन मारोतराव सवईबहाद्दुरे (वय 28 रा. रोहीखेड, ता.अकोट) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. तीन महिन्यांपूर्वी सचिनचे येवदा येथील युवतीसोबत रिवाजाप्रमाणे लग्न झाले. लग्नानंतर कौटुंबिक वाद सुरू झाल्यामुळे भांडण होऊन सचिनची पत्नी रोहीखेड येथून काही दिवसांपूर्वीच येवदामध्ये माहेरी परत आली. पत्नीने परत यावे यासाठी सचिनने प्रयत्न सुरू केले. तो स्वत:, आई, जावयांसह इतर काही निवडक नातेवाइकांना घेऊन, कौटुंबिक वाद मिटावा, नवविवाहितेने पतीसोबत परत जावे, याकरिता रविवारी (ता. सहा) पत्नीच्या माहेरी आला होता. त्यावेळी सचिनची सासू व मेहूणा यांच्यासोबत चर्चा केल्यानंतरही त्यांनी लगेच पत्नीला पतीसोबत पाठविण्यास नकार दिला. दसरा आटोपल्यावर त्याबाबत निर्णय घेऊ. असे पत्नीच्या माहेरच्यांनी सचिनला सांगितले. त्यामुळे त्याचे सर्व नातेवाइक अकोटकडे रवाना झाले. सचिनने स्वत:चा मोबाईल आपल्या आईकडे देऊन तो रेल्वेचे रिझव्हेशन करायचे आहे, सायंकाळपर्यंत परत येतो, असे सांगून तेथेच थांबला. रविवारी रात्री अकरा ते साडेअकराच्या सुमारास सचिन पुन्हा येवदा येथे पत्नीच्या माहेरी गेला. त्याने पुन्हा उद्या दसरा असल्याने पत्नीला सोबत गावी चालण्याची विनंती केली. परंतु त्याला कुणी दाद दिली नाही. त्यामुळे त्याने सासऱ्याच्या घरासमोरच सोबत आणलेले रॉकेल आपल्या अंगावर ओतून घेऊन स्वत:ला जाळून घेतले. 95 टक्के जळालेल्या सचिन सवाईबहाद्दुर यांना त्याचा मेहूणा विरु मोहोड यांनी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सोमवारी (ता. सात) सकाळी पावणे आठच्या सुमारास सचिनचा मृत्यू झाला. मृत युवकाच्या नातेवाइकांनी सचिनच्या आत्महत्येस त्याची पत्नीसह मेहूणा व सासरची मंडळी जबाबदार आहे, असा आरोप केला. प्रकरणी पोलिसांनी मेहुण्यासह पत्नी व त्याच्या सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला.

तक्रारीनंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. याप्रकरणात आवश्‍यक ते बयाण नोंदविल्या जाईल. सखोल चौकशीअंती आवश्‍यकता भासल्यास अटकेची कारवाई होईल.
- तपन कोल्हे, पोलिस निरीक्षक, येवदा ठाणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother-in-law commits suicide