सुनेच्या जाचाला त्रासून सासूची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नागपूर : सुनेच्या शारीरिक व मानसिक जाचाला कंटाळून वृद्ध सासू सत्यभामा देवराव कामडी (रा. मानेवाडा रोड, 118 श्रीहरीनगर क्रमांक 2) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. पतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यभामा यांनी 10 जुलैला दुपारी हुडकेश्‍वर हद्दीतील मानेवाडा घाटाजवळ विष प्राशन केले. त्यांची प्रकृती खराब झाल्याने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. हुडकेश्‍वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. मर्ग चौकशीअंती सुरेश देवराव कामडी (46) यांची पत्नी स्मिता (43) हिने आई सत्यभामा यांना सतत शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले. सुरेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी आरोपी सून स्मिताविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, अटक करणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother-in-law commits suicide by harassing Sune