चालत्या बसमध्ये नवजात बाळाला जन्म देऊन आई पसार

baby
baby

यवतमाळ : सायंकाळी सुमारास पांढरकवडा आगाराच्या बसमध्ये मातृत्वाच्या नाताल्या काळीमा फासणारी घटना घडली. एका गर्भवती महिला प्रवाशाने एसटी बसमध्येच नवजात बाळाला जन्म देऊन कोणाचेही आपल्याकडे लक्ष नाही याची खात्री करुन ती महीला नवजात बाळाला एसटी बसमध्ये सोडुन पसार झाली.

पांढरकवडा आगाराची एसटी बस (MH 06 S 8824) पांढरकवडा बसस्थानकातुन  पांढरकवडा ते यवतमाळ करिता निघाली. पांढरकवडा बसस्थानकातुन 40 ते 45  प्रवाशांनी भरलेली बस यवतमाळ कडे निघाली. चालक बस चालवत होते तर वाहक प्रवाशांची तिकिट काढण्यात मग्न होते. प्रत्येक थांब्यावरुन प्रवाशांची चढ उतार होत होती. सायंकाळची वेळ असल्याने व बस मधील लाइट चालु असल्याने बसचालकाला बस चालवायला अडथळा होत असल्याने बस मधील लाईट बंद केले.आणि पुढचा प्रवास सुरु‌ झाला. त्या अंधारातच एका गर्भवती महिला प्रवाशाची प्रसुती झाली. आणि एक नवजात बाळाला चालत्या बसमध्येच जन्म दिला. 

पण, या प्रसुतीचा व त्या गर्भवती महिलेच्या प्रसुती कळेचा जराही अंदाज इतर बसमधील प्रवाशाला येऊ दिला नाही. समोर तर आणखी हृदय हेलावणारी घटना घडली. त्या महिलेने‌ नवजात बाळाला बसमध्ये जन्म दिला व आपल्याकडे कुणाचेच लक्ष नाही याची खात्री करुन स्वत: त्या बाळाला बसमध्येच बेवारस टाकुन मधातच थांब्यावर उतरुन पसार झाली. ही बस यवतमाळ बसस्थानकावर आली असता सर्व प्रवासी बसमधुन उतरले. त्या नवजात बाळावर एकाही प्रवाशांचे लक्ष गेले नाही. ड्युटी संपल्यामुळे बस मधील‌ वाहक व चालक बस खाली उतरायला निघाले तेव्हा त्यांच्या पायापर्यंत रक्ताची थारोळी आलेली दिसली. तेव्हा त्याने बसमधील मधोमध मागील आसनांखाली बघितले तर एक नवजात बाळ दिसले. त्यावेळेस बसस्थानकावर उपस्थित असलेले इतर कर्मचाऱ्यांना याची कल्पना दिली. त्यावेळेस बाळाला बघितले असता बाळ मृत अवस्थेत होत.

यवतमाळ आगारात कार्यरत बसस्थानक प्रमुख गोविंद उजवने, सहायक वाहतूक निरीक्षक दिगांबर गावंडे, व‌ कर्मचारी जितेंद्र दवारे तसेच सदर बसचे चालक-वाहक यांनी वडगाव पोलिस स्टेशन यवतमाळ येथे जाऊन झालेल्या घटनेबाबत कल्पना दिली.  पोलिस अधिकाऱ्यांनी बसस्थानक गाठुन घटनेचा पंचनामा केला. मृत नवजात बाळ जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुपूर्द करण्यात आले. बाळाला जन्म देणाऱ्या आईचा शोध वडगाव पोलीस ठाणे करीत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com