दोन मुलासह आईचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू

गणेशराव बर्वे
सोमवार, 24 डिसेंबर 2018

नेहरूनगरमध्ये राहणाऱ्या परिवारातील एका आईने आपल्या दोन चिमुकल्यासह विष प्राशन केले. यामध्ये एक मुलगा दगावला असून दूसरा मुलगा आणि आई गंभीर आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले.
 

तुमसर- येथिल नेहरूनगरमध्ये राहणाऱ्या परिवारातील एका आईने आपल्या दोन चिमुकल्यासह विष प्राशन केले. यामध्ये एक मुलगा दगावला असून दूसरा मुलगा आणि आई गंभीर आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले.

किरकोळ वादातून ही घटना घडली असून, आईने स्वतः उंदीर मारण्याचे औषध प्राशन केलं, एवढ्यावरच ती थांबली नाही तर तिने आपल्या दोन मुलाला दुधामध्ये उंदीर मारण्याच्या गोळ्या दिल्या.

सविस्तर वृत्त असे की, मंगेश पारडकर हा नेहरु नगर तुमसर येथे राहत असुन आठवडी बाजारामध्ये किरकोळ सुपारीच्या व्यवसाय करतो त्याला पलास (6) व हर्षल (5)अशी दोन मुलं आहेत. त्याची पत्नी दिप्ती आणि मंगेश याच्यामध्ये वारंवार वाद होत होते शेवटी काल दुपारी वाद विकोपाला गेला दिप्ती आणि मंगेश यांच्यामध्ये वाद झाला शेवटी दीप्ती या वादाला कंटाळली 4 वाजता बाजारात जाऊन तिने उंदीर मारण्याचे औषध घेऊन आली तिने दुधामध्ये औषध मिसळून हर्षल वय 5 वर्षे पलास वर्ष 6 या दोघांनाही पाजले आणि स्वतःही विषारी औषध प्राशन केल्याने तिची प्रकृती गंभीर  झाली शेवटी तिला शासकीय रुग्णालय तुमसर येथे  तीघांना दाखल करण्यात आले.

त्यांच्यावर  उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर झाली यामुळे तिला आणि त्या दोन्ही मुलांना नागपूरला हलविण्यात येत असताना रस्त्यामध्ये हर्षल वर्ष 5 त्याची प्राणज्योत मालवली.

Web Title: mother tried to commit suicide by eating poison one Die