दारूड्या पतीला कंटाळून दोन चिमुकल्यासह आईची आत्महत्या

दारूड्या पतीला कंटाळून दोन चिमुकल्यासह आईची आत्महत्या

अमरावती- दारूड्या पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका 27 वर्षीय महिलेने दोन चिमुकल्यांसह मालगाडी समोर आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील रेल्वे क्रॉसींगजवळ घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार दुर्गा शेखर रामटेके (वय 27),  प्रेम रामटेके (वय 1) पियु रामटेके (वय 5) असे त्या दुर्दैवी आई व दोन चिमुकल्यांची नावे आहे. चांदूर रेल्वे येथील भीमनगर येथील रहिवाशी असलेले शेखर रामटेके व दुर्गा शेखर रामटेके असे कुटूंब राहत होते. या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना अनुक्रमे एक व तीन वर्षाचे दोन मुलगे व पाच वर्षाची मुलगी आहे.

शेखर हा बांधकामवर लोहा बांधण्याचे काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने तो सतत पत्नीला पैशासाठी त्रास देत होता. पती शेखरचा पत्नी दुर्गाला दारू साठी सतत त्रास देत होता. त्यांच्यामध्ये नेहमी भांडणे होत होती. अशातच मंगळवारी रात्री पुन्हा कडाक्याचे भांडण झाले आणि त्यांनतर दुर्गा हिने आपल्या दोन मुलांसह रेल्वे समोर जाऊन आत्महत्या केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com