मोटवानी भावंडांवर दुधातून विषप्रयोग? 

मोटवानी भावंडांवर दुधातून विषप्रयोग? 

नागपूर - तात्या टोपेनगरातील वयोवृद्ध मोटवानी बहीण-भावावर विषप्रयोग झाला असावा, अशी चर्चा आज परिसरात सुरू होती. त्यामुळे पोलिस तपास आणि शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांच्या नजर आहेत. मोटवानी बहीण-भावाच्या प्रॉपर्टीवर कुणाचा डोळा असावा आणि यातूनच हे हत्याकांड घडल्याची चर्चा आहे. 

बुधवारी दुपारी बजाजनगर पोलिसांनी तात्या टोपेनगरातील एका जीर्ण घरातून मोहनलाल मोटवानी (वय 85) आणि त्यांची बहीण शांता कौर (वय 83) यांचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्यानंतर मेडिकलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. मात्र, पोलिसांनी मोटवानी भावंडांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणात पोलिसांना अनेक बाबी संशयास्पद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोहनलाल यांच्याशी सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवांचे संबंध आणि संपर्क तसेच काही संशयास्पद व्यक्‍तींचा अचानक वाढलेला संपर्क पोलिसांना खटकत आहे. मोहन आणि शांता यांच्याकडे पाकीटबंद दूध येत होते. ते बाहेरच पिशवीत ठेवले जायचे. या दुधातूनच विषप्रयोग झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. मोटवानी भावंडांच्या मृत्यूला आज जवळपास दहा दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला. परंतु, एकही नातेवाईक पुढे आलेला नाही. 

घरावर पाळत? 
मोहन मोटवानी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पाच हजार स्क्‍वेअर फूट जागेवरील घर आणि बॅंकेत असलेल्या लाखो रुपयांवर डल्ला मारण्याच्या उद्देशाने बनावट नातेवाईक तयार करण्याचा कट शिजत असल्याची चर्चा आहे. त्यांच्या घरावर काही गुंड प्रवृत्तीचे युवक पाळत ठेवून आहेत. घराबद्दल कोण माहिती विचारतोय, परिसरात काय चर्चा होते, घराकडे कोणाच्या फेऱ्या होतात, याकडे लक्ष आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com