स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

टेकाडी (जि. नागपूर) : स्वच्छ भारत, स्वस्थ भारत या केंद्र शासनाच्या धोरणाला सद्यःस्थितीत कन्हान नगर परिषदे अंतर्गत गालबोट लागत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील स्वछता कर्मचारी आपल्या मूलभूत मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करीत आहेत.

नगर परिषद प्रशासनाकडून शहराच्या स्वच्छतेचे कंत्राट खासगी कंपनीला देण्यात आले आहे. स्वच्छतेसाठी कंपनीला लाखो रुपयांचे टेंडर देण्यात आले आहे. मात्र, कंपनीकडून कर्मचाऱ्यांना वेळेवर मजुरी मिळत नसल्याने कर्मचारी त्रस्त आहेत. कंत्राट कंपनीच्या विरोधात गेल्या आठ दिवसांपासून स्वच्छता कर्मचारी काम बंद आंदोलन करीत आहेत. ज्याचा सर्वात मोठा फटका प्रभागांमधील नागरिकांना सोसावा लागत आहे. नागरिक रिकाम्या भूखंडावर कचरा टाकत आहेत. दुर्गंधीमुळे स्थानीय नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांचे आरोग्य धोक्‍यात टाकावे लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी विनय सुनील यादव यांनी तत्काळ ट्रॅक्‍टरची कचरागाडी आणि मित्रांच्या साहाय्याने श्रणदानातून प्रभागातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा विडा उचलला आहे. या अभिनव उपक्रमाने सध्या यादव हे सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement to close the work of sanitation workers