पोलिस बळावर चिरडले प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

कोरपना (चंद्रपूर) : अंबुजा सिमेंट प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असलेले प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून चिरडले. जनविकास सेनेचे पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. 24) आंदोलन सुरू होते. यामुळे येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

कोरपना (चंद्रपूर) : अंबुजा सिमेंट प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असलेले प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून चिरडले. जनविकास सेनेचे पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. 24) आंदोलन सुरू होते. यामुळे येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
या प्रकल्पातील आदिवासी प्रकल्पग्रस्तांसाठी मागील एका वर्षापासून लढा सुरू आहे. पाच मार्च 2019 रोजी अंबुजा व्यवस्थापनाने भूसंपादन कराराचा भंग केला. त्यामुळे व्यवस्थापनाविरोधात कारवाई करावी, असा प्रस्ताव महसूल विभागाच्या सहसचिवांनी राज्यशासनाकडे पाठविला. महिनाभरापूर्वी प्रकल्पग्रस्तांनी फसवणूक आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा अंबुजा व्यवस्थापनावर दाखल करावा, यासाठी गडचांदूर पोलिसांत तक्रार केली. आतापर्यंत या दोन्ही प्रकरणांत कारवाई झाली नाही. त्यामुळे आज प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. कारवाईचे लेखी आश्‍वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका देशमुखांसह आंदोलकांनी घेतली. दरम्यान, जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी महसूल सचिवांना स्मरणपत्र पाठविले. प्रकल्पग्रस्तांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमाराला कोरपनाचे उपविभागीय अधिकारी श्री. यामावार, गडचांदूरचे ठाणेदार श्री. चव्हाण आणि नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत पोलिसांनी बळाचा वापर सुरू केला. पप्पू देशमुख यांचे पाय पकडून पोलिसांनी त्यांना फरपटत नेले. आंदोलनकर्ते पुरुष आणि महिलांवरही बळाचा वापर केला, असा आरोप आंदोलकर्त्यांचा आहे. या सर्वांना अटक करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The movement of the project affected by the police force