चित्रपटांपेक्षा मंदिरात अधिक ‘पोटेंशियल’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

नागपूर - मंदिर व्यवस्थापन हे मोठे उद्योग आहे. चित्रपट उद्योगापेक्षाही अधिक संपन्नता आणि रोजगाराच्या अनेक संभावना या क्षेत्रात आहे. समाजाभिमुख स्वरूप व शैक्षणिक अभ्यासक्रमाची जोड दिल्यास समाजाला त्याचा निश्‍चितच उपयोग होईल, असा विश्‍वास शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी व्यक्त केला.

नागपूर - मंदिर व्यवस्थापन हे मोठे उद्योग आहे. चित्रपट उद्योगापेक्षाही अधिक संपन्नता आणि रोजगाराच्या अनेक संभावना या क्षेत्रात आहे. समाजाभिमुख स्वरूप व शैक्षणिक अभ्यासक्रमाची जोड दिल्यास समाजाला त्याचा निश्‍चितच उपयोग होईल, असा विश्‍वास शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी व्यक्त केला.

स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानतर्फे सोमवारी धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात आयोजित दादासाहेब काळमेघ पुण्यस्मरण सोहळ्यात ते अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते. हावरे यांच्या पत्नी नलिनी हावरे, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू  डॉ. पंकज चांदे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव पुरण मेश्राम,  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस. टी. देशमुख, दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद काळमेघ, सचिव हेमंत काळमेघ, कोषाध्यक्ष आर. एम. सिंह, धनवटे नॅशनल कॉलेजचे कार्यकारी प्राचार्य डॉ. पी. एस. चंगोले, शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चांदेकर, दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय पाटील उपस्थित होते.

अध्यात्मात दुकानदारी वाढली आहे. ती कमी करण्यासाठी टेम्पल मॅनेजमेंट विषय अभ्यासक्रमात यावी. शिक्षण देऊन पुजाऱ्याऐवजी टेम्पल मॅनेजर नियुक्त केले जावे. शिर्डीतही दुकानदारी बंद होऊन सेवाभाव रुजेल असा विश्‍वास व्यक्त करीत देशातील ३० लाख मंदिरांमध्ये ती संधी असल्याचे सुरेश हावरे म्हणाले. अन्य मान्यवरांनी भाषणातून काळमेघ यांच्या स्मृतींना उजाळा दिला. प्रास्ताविक पी. एस. चंगोले यांनी केले. संचालन रवींद्र शोभणे यांनी केले.

स्थळाच्या वादाला उत्तर
दरवर्षी हा कार्यक्रम विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात होत होता. यंदा कार्यक्रमासाठी सभागृह देण्यास नकार दिला. त्यावरून निर्माण झालेल्या वादाला काळमेघ बंधूंनी उत्तर दिले. पुढच्या वर्षीही या कार्यक्रमासाठी रीतसर परवानगी मागितली जाईल. ती पुन्हा नाकारल्यास एकाच दिवशी ११ ठिकाणी हा कार्यक्रम घेण्याची घोषणा त्यांनी केली. सुरेश हावरे यांनीही मुंबईत हा सोहळा घेण्याची तयारी दर्शविली.

Web Title: movie temple potential suresh haware