खासदार-आमदारात बाचाबाची; दोघेही म्हणाले ‘वाद घातला नाही, नंतर बोलू’

MP and MLA clash in Washim political news
MP and MLA clash in Washim political news

वाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद झाला. यानंतर हा वाद विकोपाला जाऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वाद विकोपाला गेला.

वाशीम यवतमाळच्या सेनेच्या खासदार भावना गवळी आणि कारंजा मतदार संघाचे भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामधील राजकीय वैर तसा जुनाच. मात्र, मंगळवारी वाशीमच्या जिल्हा नियोजन भवन इथे जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सगळे लोकप्रतिनिधी आढावा बैठकीत उपस्थित राहणार होते.

त्यापूर्वी ‘विकासकामांत अडथला निर्माण करून शिवसेनेने आणलेल्या विकास कामाला बाधा निर्माण का करता’ अस म्हणत खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी आमने-सामने आले. त्यांच्यात चांगलीच ‘तू तू मै मै’ झाली. या दरम्यान शिवागाळही झाली.

शिवसेनेच्या कार्यकर्ते आमदार पाटणी  यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर तिथे उपस्थित पोलिसांच्या मदतीने वाद निवळला. यानंतर आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशीम पोलिस ठाण्यात खासदार भावना गवळी यांनी धमकी दिल्याची तक्रार दाखल केली.

यावर राजेंद्र पाटणी यांना याविषयी विचारले असता त्यांनी सांगितल, ‘मी कुठलाच वाद घातला नाही’ अशी प्रतिक्रिया दिली. तर सेना खासदार भावना  गवळी यांना झालेल्या प्रकारावर विचारले असता ‘नंतर बोलेल असे सांगून’ बोलण्याचे टाळले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भाजप-सेनेचे कार्यकर्ते जमा झाल्या ने वाद उदभवणार हे लक्षात येताच पोलिसांनी बंदिबस्तात वाढ केली होती. या प्रकारानंतर भाजपच्या वतीने शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com