देशापुढील २०१९ नंतरची आव्हाने? खासदार केतकर साधणार अकोलेकरांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

देशातील सातत्याने बदलणाऱ्या, सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीमुळे नवीन पिढीसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशातील ही स्थिती व २०१९ नंतरची आव्हाने याविषयी खासदार कुमार केतकर अकोलेकरांशी १ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रमिलताई ओक सभागृहात संवाद साधणार असल्याची माहिती, कार्यक्रमाचे आयोजक शेतकरी जागर मंचद्वारे  आयोजित पत्रकार परिषदेतून देण्यात आली. 

अकोला : देशातील सातत्याने बदलणाऱ्या, सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीमुळे नवीन पिढीसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशातील ही स्थिती व २०१९ नंतरची आव्हाने याविषयी खासदार कुमार केतकर अकोलेकरांशी १ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रमिलताई ओक सभागृहात संवाद साधणार असल्याची माहिती, कार्यक्रमाचे आयोजक शेतकरी जागर मंचद्वारे  आयोजित पत्रकार परिषदेतून देण्यात आली. 

खासदार कुमार केतकर हे शेतकरी जागर मंचच्या आमंत्रणावरून अकोला येथे येत आहेत. शेतकरी जागर मंचद्वारे निवेदन, धरणे, रास्तारोको, आंदोलन व चर्चेतून शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारकेडे मांडत आहे. परंतु, सरकार आंदोलनकर्ते, विरोधीपक्ष, माध्यमे व न्यायपालिका यापैकी कोणाचेच एेकायला तयार नाही. त्यामुळे समाज प्रबोधनाचा एकमेव मार्ग उरल्याने, शेतकरी जागर मंचने ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासू व्यक्तीमत्व खासदार कुमार केतकर यांना निमंत्रित केले असून, देशासमोर निर्माण झालेल्या परिस्थितीचे अचूनक विवेचन ते अकोलेकरांसमोर माडणार आहेत. सामान्य नागरिक म्हणून या स्थितीविषयी प्रत्येकाची काय जबाबदारी आहे हे सुद्धा त्यांच्या विवेचनातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या बौद्धीक उपक्रमात प्रत्येकाने सहभागी व्हावे असे आवाहन, शेतकरी जागर मंचच्या वतीने करण्यात आले. पत्रकार परिषदेत शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, विजय देशमुख, जगदीश मुरूमकार, ज्ञानेश्वर सुलताने, ज्ञानेश्वर गावंडे, गजानन हरणे, सलीम शेख, प्रमोद पाटील, शे.अन्सार, दिलीप मोहोड आदींची उपस्थिती होती. 

नाना पटोले साधतील संवाद 
शेतकरी प्रश्नावर खासदारकीचा राजीनामा देणारे माजी खासदार नानाभाऊ पटोले सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होणार असून, अकोलेकरांशी संवादसाधणार अाहेत. याच भेटीदरम्यान खासदार कुमार केतकर मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

Web Title: mp kumar ketkar visit to akola