अमरावतीत नवनीत राणांचा रुद्रावतार; डॉक्टर्सची घेतली शाळा (व्हिडिओ)

MP Navneet Rana inspected the District General Hospital at amravati
MP Navneet Rana inspected the District General Hospital at amravati

अमरावती : लोकसभेचे सत्र सुरू असताना खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा स्त्री रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी करताना चांगलीच झाडाझडती घेतली. त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये लहान बाळाच्या कक्षांमधील शौचालयाची अवस्था पाहून त्या चांगल्याच भडकल्या.

लहान मुलांच्या वार्डात ही अवस्था असेल तर बाकीचे काय ? असा प्रश्न विचारत अधिकाऱ्यांना चांगले खडे बोल सुनावले. येथील शौचालय आणि वार्डांची अवस्था फारच बिकट आहे. अस्वच्छतेत येथे रुग्णांवर उपचार केले जातात. नवनीत राणा यांनी चाइल्ड केअर विभागाच्या प्रमुखांनाही जाब विचारला. लहान मुलांना वैधता संपलेली औषधे दिली जातात. याविषयी राणा यांनी संबंधित जबाबदार डॉक्टरांना खडे बोल सुनावले.  

या विभागाच्या आत तर घाण आहेच पण बाहेरही वेगळी परिस्थिती नाही. ओला-सुका कचरा विभागाच्या भिंतींजवळ जमा आहे. स्वच्छतागृहांची साफसफाई नीट केली जात नाही. त्यामुळे 'मी दर महिन्यात या दवाखान्याला भेट देईन. मला सगळे वॉर्ड, शौचालय आणि रुग्णालयाचा परिसर स्वच्छ दिसला पाहिजे,' अशी तंबी राणा यांनी रुग्णालय प्रशासनाला दिली. यावेळी युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com