खासदार नवनीत राणांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी (व्हिडिओ) 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

परतीच्या पावसाने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक मातीमोल झाले. अमरावती जिल्ह्याला देखील या पावसाचा मोठा फटका बसला.

अमरावती : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांनी शनिवारी पिकांची पाहणी शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

परतीच्या पावसाने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक मातीमोल झाले. अमरावती जिल्ह्याला देखील या पावसाचा मोठा फटका बसला. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांनी शनिवारी भातकुली तालुक्‍यासह दर्यापूर तालुक्‍यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान राणा यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधला. 

लवकरच आर्थिक मदत मिळवून देणार 
या दौऱ्यादरम्यान खासदार राणा यांच्यासोबत कृषी विभागाचे संबंधित अधिकारी देखील प्रामुख्याने उपस्थित होते. खासदार राणा यांनी शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या अडचणी जाणून घेवून त्या सोडविण्यासंदर्भात कृषी विभागाला निर्देश दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे त्वरित पूर्ण करून त्याचा अहवाल पाठविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच वरिष्ठस्तरावर आपण स्वतः याचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Navneet Rana inspects damaged agriculture