कारागृहाबाहेर खासदार नवनीत राणा यांचे धरणे आंदोलन; पोलिसांनी नाकारली रवी राणांची भेट 

MP Navneet rana protest front of Central jail
MP Navneet rana protest front of Central jail

अमरावती : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत व विज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी काल आमदार रवी राणा यांनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केल्याप्रकरणी त्यांच्या सह १६ कार्यकर्त्याना पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल केल्यानंतर आता न्यायालयाने काल रात्री उशिरा आमदार रवी राणा यांच्या सह १६ कार्यकर्त्यांना सहा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.दरम्यान कोरोनाचा काळ असल्यानें मध्यवर्ती कारागृहाच्या विलगिकरन कक्षात रवी राणा यांच्या सह कार्यकर्त्यांना ठेवण्यात आले आहे..

आमदार रवी राणा यांना भेटू न दिल्याने खासदार नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार रवी राणा यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून काल मोझरी येथे आंदोलन करण्यात आल्याने रवी राणा यांना पोलिसांनी अटक केली होती, त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत जमीन घेण्यास नकार दिल्याने त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. 

दरम्यान, आज खासदार नवनीत राणा त्यांना भेटण्यासाठी गेल्या असता त्यांना भेट नाकारण्यात आल्याने त्यांनी त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत आमदार रवी राणा यांची भेट होणार नाही तोपर्यंत कारागृहाबाहेर धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याची खासदार नवनीत राणा यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली.
दरम्यान, आमदार रवी राणा यांचे कारागृहात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

काय होते आंदोलनाचे कारण 

अतिरिक्त विजबिलमुळे सर्व सामान्य जनता हैराण झाली आहे.यातच अतिवृष्टी पावसामुळे सोयाबीन , व कपाशीवर बोन्डआळीचा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला त्यामुळे सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50 हजार मदत व विजबिल माफी करावी यासाठी आमदार रवी यांनी शेकडो शेतकऱ्यांना घेऊन अमरावतीच्या गुरूकुंज मोझरी येथे रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे पोलीसांनी आंदोलन स्थळावरून आमदारासह १६ कार्यकर्त्यांना अटक करत गुन्हे दाखल केले होते . 
 
संपादन - अथर्व महांकाळ  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com