कार्यक्रमात भोवळ आल्याने खासदार पटोले रुग्णालयात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

भंडारा : भंडारा-गोंदिया क्षेत्राचे खासदार नानाभाऊ पटोले यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना नागपूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

भंडारा : भंडारा-गोंदिया क्षेत्राचे खासदार नानाभाऊ पटोले यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना नागपूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

साकोली तालुक्‍यातील शिवनीबांध येथे आज जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पटोले यांनी जलतरण स्पर्धेचे उद्‌घाटन केले. त्यानंतर त्यांना अचानक भोवळ आली. त्यामुळे त्यांच्यावर लगेचच साकोली उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले.

त्यानंतर भंडारा येथील खासगी रुग्णालयात तपासणी करून नागपूर येथे न्युरॉन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तिथे त्यांच्या अन्य तपासण्या करण्यात आल्या. काळजी करण्याचे कारण नसल्याचे मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांनी सांगितले.

Web Title: mp patole admitted to hospital