खाद्य निगम सल्लागार समिती अध्यक्षपदी खासदार तडस

file photo
file photo

वर्धा : भारतीय खाद्य निगम महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी खासदार रामदास तडस यांची नियुक्‍ती करण्यात आली. भारत सरकारच्या वतीने प्रत्येक राज्यात व केंद्र शासित प्रदेशात भारतीय खाद्य निगमच्या राज्य सल्लागार समितीवर अध्यक्ष म्हणून लोकसभा सदस्यांमधून नियुक्तीकरिता शिफारस केली जाते. केंद्र शासनाने वर्धा लोकसभा क्षेत्रातून दुसऱ्यांदा लोकसभेत निर्वाचित झालेले खासदार रामदास तडस यांना बहुमान दिला आहे.
या समितीच्या पदसिद्ध सदस्यपदी राज्य शासनाचे पुरवठा विभाग सचिव कार्यरत असतात तर सदस्य सचिव म्हणून भारतीय खाद्य निगम महाराष्ट्र क्षेत्राचे महाव्यवस्थापक पदसिद्ध कार्य करीत असतात. केंद्र शासनाकडून राज्य सरकारला होणाऱ्या सार्वजनिक वितरण प्रणालीवर देखरेख ठेवणे, केंद्र व राज्य सरकारमध्ये समन्वय ठेवणे, भारतीय खाद्य निगमाच्या कार्यावर देखरेख ठेवणे, महाराष्ट्र राज्यातील भारतीय खाद्य निगमअंतर्गत खाद्य गोदामांची पाहणी करणे, खाद्य निगम कार्यालयांना व गोदामांना भेटी देऊन सूचना देणे आदी महत्त्वपूर्ण बाबी भारतीय खाद्य निगम सल्लागार समितीच्या कार्यकक्षेत येतात. या समितीचे मुख्यालय मुंबई येथे कार्यरत असणार आहे.
वर्धा लोकसभा क्षेत्रातून भारतीय खाद्य निगम महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार तडस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष तथा गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com