अकोला: खासदारांचा शहर वाहतूक बसमधून प्रवास

वृत्तसंस्था
रविवार, 1 एप्रिल 2018

शहर बस वाहतुकीसाठी मनपात्या ताफ्यात दाखल झालेल्या नवीन बसच्या लोकार्पण सोहळ्यानंतर अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे यांनी बसमधून प्रवास करीत नागरिकांना या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. 

अकोला : शहरातील नागरिकांकरिता महापालिकेतर्फे बस वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शहर बस वाहतुकीसाठी मनपात्या ताफ्यात दाखल झालेल्या नवीन बसच्या लोकार्पण सोहळ्यानंतर अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे यांनी बसमधून प्रवास करीत नागरिकांना या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. 

महापालिका निवडणुकीपूर्वी जानेवारी २०१७ मध्ये अकोला शहरातील बस वाहतूक सेवा नव्याने सुरू करण्यात आली होती. निवडणुकीपूर्वी पाच बस मनपाला मिळाल्या होत्या. त्या सुरूही करण्यात आल्यात. मात्र, त्यानंतर उर्वरित बस मनपाच्या ताफ्यात दाखल होण्यास तब्बल सव्वा वर्ष लागले. आर्थिक वर्षाच्या शेवटी ३१ मार्च २०१८ पूर्वी मिळाल्या या बसचे दुसऱ्या टप्प्यातील लोकार्पण रविवारी खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर आणि महापालिका पदाधिकारी व नगरसेवकांची उपस्थिती होती. लोकापर्णानंतर खासदारांनी आमदारांसोबत चक्क बसमध्ये बसून प्रवास करीत नागरिकांना या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. 

Web Title: MP use bus transport in Akola