डॉ. फडणवीस सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

नागपूर - येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी मिलिंद फडणवीस यांची राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर गुरुवारी नियुक्‍ती केली. येत्या रविवारी (ता.६) त्या विद्यापीठात रुजू होणार आहेत.

डॉ एन. एन. मालदार यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ दिनांक १० डिसेंबर २०१७  रोजी संपल्यापासून हे पद रिक्त होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन  करमाळकर हे सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते. 

नागपूर - येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी मिलिंद फडणवीस यांची राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर गुरुवारी नियुक्‍ती केली. येत्या रविवारी (ता.६) त्या विद्यापीठात रुजू होणार आहेत.

डॉ एन. एन. मालदार यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ दिनांक १० डिसेंबर २०१७  रोजी संपल्यापासून हे पद रिक्त होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन  करमाळकर हे सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते. 

डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी मध्य प्रदेशातील सागरच्या डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठातून  अर्थशास्त्र तसेच एकॉनोमेट्रिक्‍स या विषयांत एम.ए. तसेच पीएच.डी. प्राप्त केली असून, त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. महिला महाविद्यालयात १९८३ साली त्या प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. यानंतर २००३ साली त्यांची महाविद्यालयात प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०११-२०१५ या दरम्यान त्या विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सदस्या होत्या. याशिवाय त्यांनी वर्धा आणि नागपूर येथील जिल्हा नियोजन समितीत सदस्य  म्हणून काम केले आहे.

विद्यापीठातील अभ्यास मंडळे आणि विविध प्राधिकरणांचाही त्यांना अनुभव आहे. सध्या त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषदेवर राज्यपाल नामित सदस्य म्हणून कार्यरत आहेत.  
सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायामूर्ती पी. वेंकटरामा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नियुक्त केली होती. प्रो. शंतनू चौधरी, संचालक, सेंट्रल इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, (सीरी) पिलानी,  राजस्थान व मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी समितीचे  सदस्य होते. नागपूर, अमरावती, एसएनडीटीसाठीही होती चर्चा गेल्या काही वर्षांपासून विविध विद्यापीठातील कुलगुरुपदाच्या शर्यतीत डॉ. फडणवीस सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी
डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या नावाची बरीच चर्चा होती. त्यापैकी नागपूर, अमरावती, एसएनडीटी आणि गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा जोरदार होती. एसएनडीटीसाठी त्यांचे नाव अंतिम झाल्याचेही समोर आले होते. प्रत्येकवेळी पहिल्या पाच नावांमध्ये त्यांचा समावेश  राहायचा हे विशेष. 

ग्रामीण भागातील महाविद्यालयांच्या विकासावर भर - डॉ. मृणालिनी फडणवीस 
सोलापूर विद्यापीठात बराचसा भाग ग्रामीण आहे. त्या भागातील महाविद्यालयांच्या विकास करण्यासाठी आणि डिजिटलायझेशन करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. तांत्रिक शाखांप्रमाणेच मानव्यशास्त्रे आणि वाणिज्यसारख्या शाखांच्या उत्थानासाठी काम करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

आतापर्यंत झालेले नागपूरकर कुलगुरू 
मुंबई विद्यापीठ - डॉ. राजन वेळुकर (निवृत्त), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - डॉ. वासुदेव गाडे (निवृत्त), डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ - डॉ. राजू मानकर (निवृत्त), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ - डॉ. राजन वेळूकर (निवृत्त), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ -डॉ. कृष्णकुमार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ - डॉ. कमलसिंह (निवृत्त), डॉ. मोहन खेडकर (निवृत्त), डॉ. मुरलीधर चांदेकर (कार्यरत), एसएनडीटी विद्यापीठ- डॉ. शशी वंजारी (कार्यरत), गोंडवाना विद्यापीठ- डॉ. विजय आईंचवार(निवृत्त), उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव - डॉ. सुधीर मेश्राम (निवृत्त).

Web Title: mrunialini fadnavis solapur university vice chancellor