Congress : वीज चोरी प्रकरणी काँग्रेसच्या बड्या नेत्याला महावितरणचा दणका; ठोठावला १० लाखांचा दंड

mseb fined 10 lakh to malkapur buldhana congress leader over electricity theft buldhana news
mseb fined 10 lakh to malkapur buldhana congress leader over electricity theft buldhana news

बुलढाणा जिल्ह्यात एका बड्या काँग्रेस नेत्या वीज चोरी केल्याचा प्रकार प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील मलाकपूर येथे एका काँग्रेस नेत्याला वीज चोरी केल्याप्रकरणात तब्बल १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात मागील सव्वा दोन वर्षांपासून वीज चोरी सुरू होती अशी माहिती समोर आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील भरारी पथकाने केलेले कारवाईत ६० हजार ९७८ युनिट विजेची चोरी झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यास तब्बल १० लाख ४७ हजार ९२२ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील एका बड्या काँग्रेस नेत्याकडून आपल्या रुग्णालयात आणि घरात वीज चोरी केली जात होती. दरम्यान बुलढाणा विद्युत भरारी पथकाने या काँग्रेस नेत्याच्या घर आणि रुग्णालयातील विद्युत मिटरची तपासणी केली यामध्ये मिटरमध्ये छेडछाड केल्याचे समोर आले. या माध्यामातून तब्बल सव्वा दोन वर्षांपासून वीज चोरी सुरू होती.या कारवाईत काँग्रेस नेत्याच्या घरात आणि रुग्णालयात लवलेले विद्युत मिटर जप्त करण्यात आले आहे.

mseb fined 10 lakh to malkapur buldhana congress leader over electricity theft buldhana news
Latur Accident News : औसा-निलंगा मार्गावर भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार

या वीज चोरी करणाऱ्या काँग्रेस नेत्याने तीन टर्म मलकापूर विधानसभेमध्ये निवडणूक सुद्धा लढवलेली आहे. एकदा अपक्ष तर दोनदा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. तसेच निवडणूक लागण्याच्या अगोदर मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ते मुख्य प्रशासक म्हणून कारभार पाहत होते.

mseb fined 10 lakh to malkapur buldhana congress leader over electricity theft buldhana news
Pune News : पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने मागितली ३ कोटींची खंडणी; दोघांविरोधात गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com