एमटीडीसी पूर्व विदर्भात उभारणार तीन संकुले

File photo
File photo

नागपूर : विदर्भातील पर्यटनाला बूस्ट देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पूर्व विदर्भातील चांदपूर, नलेश्‍वर, नवेगावबांध या तीन ठिकाणी पर्यटन संकुले उभारणार आहे. त्यासाठी 20 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. नवेगावबांध येथील पर्यटन संकुल पुढील पाच महिन्यांत पर्यटकांच्या सेवेत दाखल होईल.
विदर्भात पर्यटनासाठी अनेक चांगली स्थळे आहेत. ताडोबा-अंधारी, पेंच, बोर, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पासह अभयारण्यात वन्यजीव पर्यटनासाठी पर्यटकांची कायम गर्दी असते. ताडोबा-अंधारी, नागझिरा, पेंच आणि बोर व्याघ्र प्रकल्पात एमटीडीसीचे स्वतःचे पर्यटन संकुल आहे. रामटेक, बोधलकसासह इतरही काही ठिकाणी संकुल असून या संकुलातील बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत असतो. पर्यटकांचा विदर्भातील ओढा लक्षात घेता आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पांगडी गेटजवळील नलेश्‍वर येथे पर्यटन संकुल बांधण्याचे निश्‍चित केले आहे. नालेश्‍वर चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्‍यात असून साडेसात एकरमध्ये हे संकुल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्‍यातील चांदपूर या तलावा शेजारी एक एकर परिसरात पर्यटन संकुलाचे बांधकाम केले जात आहे. त्यासाठी चार कोटींचा निधी मंजूर झाला. 15 खोल्या बांधण्यात येणार आहेत.
नवेगावबांध येथेही साडेबारा एकर परिसरात पर्यटन संकुल बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या संकुलासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. येत्या पाच ते सहा महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्याच्या अखेरीस पर्यटकांच्या सेवेत दाखल होण्याची शक्‍यता आहे.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना सूट
एमटीडीसीने ज्येष्ठ नागरिकांना सोमवार ते गुरुवार 20 टक्के, शासकीय कर्मचाऱ्यांना 10 टक्के, दिव्यांगाना 40 टक्के, माजी सैनिकांना 20 टक्के सूट महामंडळ चालवित असलेल्या पर्यटन निवासाच्या आरक्षणावर दिली जाते.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com