बहुप्रतीक्षित पालखी मार्गाचे आज भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

अमरावती : भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती तुषार भारतीय यांच्या प्रयत्नातून भूतेश्‍वर चौक ते साईनगर या पालखी मार्गाचे कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे. या रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते रविवारी (ता. 28) सायंकाळी होत आहे.

नगरसेवक भारतीय यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भूतेश्‍वर चौक ते साईनगर या पालखी मार्गाकरिता विशेष रस्ते विकास अनुदान योजनेतून दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात यश मिळवले आहे. रविवारी (ता. 28) सायंकाळी त्याच्या भूमिपूजनाचा सोहळा सायंकाळी 7 वाजता श्री शिवाजी कर्मशियल मार्केट जवळ शिलांगण रोड येथे होत आहे. पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते भूमिपूजन होत असलेल्या या सोहळ्यास महापौर संजय नरवणे अध्यक्षस्थानी आहेत. विदर्भ सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार डॉ. सुनील देशमुख, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, उपमहापौर संध्या टिकले, शहराध्यक्ष जंयत डेहनकर, मनपा आयुक्त संजय निपाणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहण्याची विनंती नगरसेवक चेतन गावंडे, अजय सारसकर, इंदू सावरकर, सचिन रासणे, प्रणीत सोनी, लवीना हर्षे, स्वाती कुलकर्णी, रेखा भूतडा, सुनंदा खरडे, आशीष अतकरे यांनी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The much-awaited Palakhi Road Bhumipoojan today