मूल नगर पालिका स्वच्छता अॅप क्रमवारीत देशात प्रथम

mul
mul

मूल : येथिल नगर परिषदेने स्वच्छता अॅपच्या क्रमवारीत देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला अाहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नागरीकांच्या स्वच्छतेच्या तक्रारीचे निवारण करण्याकरीता या अॅपची निर्मिती करण्यात अाली होती. या क्रमवारीत मूल नगरपालिकेने देशात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

25 हजार 449 लोकसंख्या असलेल्या शहरात 2 हजार 385 नागरीकांनी स्वच्छता अॅप डाउनलोड केले आहे. सप्टेंबर महिन्यात 594 तर नोव्हेंबर महिन्यात 23 व नोव्हेंबर महिन्यातही वापरकर्त्यांना स्वच्छता अॅप वापर केला अाहे. या अॅपच्या माध्यमातून शहरात स्वच्छता राखली जात आहे. तसेच स्वच्छतेच्या संदर्भातील समस्या, तक्रारी सोडविल्या जात अाहे. नागरीकांनी दाखवलेल्या कार्यतत्परते मुळे मूल नगर परिषदेने देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला  आहे. स्वच्छतेच्या प्राप्त तक्रारी लगेच सोडविण्याकरीता नगर परिषद प्रशासन विशेष प्राधान्य देत अाहेत. 

तक्रारी करण्याकरीता स्मार्ट पध्दतीने स्वच्छता अॅपचा वापर करीत असल्याबदल नगराध्यक्ष रत्नमालाताई भोयर यांनी सर्व मूल वासीयांचे आभार मानले आहे. मूल शहराचे स्थान देशात याच पध्दतीने कायम राहण्याकरीता अधिक संख्येने  स्वच्छता अॅप मार्फत तक्रारी नोंदविण्याकरीता मूलवासियांना त्यांनी आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com