Crime News : युवकाच्या खुनाचा प्रयत्न! डोळ्यात तिखट टाकून गळा चिरला | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime News

Amravati Crime News : युवकाच्या खुनाचा प्रयत्न! डोळ्यात तिखट टाकून गळा चिरला

अमरावती : युवकाच्या घरात शिरून आधी डोळ्यात तिखट फेकून त्यानंतर धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आश्विन अरुण पवार (वय ३३, रा. आदिवासी कॉलनी, अमरावती) असे हल्ल्यातील गंभीर जखमी युवकाचे नाव आहे.

जखमी युवकाच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी संशयित बंडू ढेकरे (वय ३२, रा. आदिवासी कॉलनी) विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. असे पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी सांगितले. जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

आश्विन पवार हा मंगळवारी ड्यूटीकरुन घरी परत आला असता, त्याला दाराचा आवाज आला. दार उघडताच, परिसरात राहणारा संशयित बंडू ढेकरे हा अचानक आश्विनच्या घरामध्ये शिरला. सोबत आणलेले तिखट आश्विन पवार याच्या डोळ्यात फेकले. त्यानंतर जवळच्या चाकूने त्याच्या गळ्यावर वार करून हत्या करण्याचा प्रयत्न केला.

झटापट झाल्यानंतर आश्विनच्या दोन्ही हातावर सुद्धा संशयिताने चाकूने प्रहार केला. शिवाय घरातील पितळेची मुर्ती आश्विनच्या डोक्यावर फेकून मारल्याने गंभीर दुखापत झाली. संशयित बंडू ढेकरे विरुद्ध आश्विन पवार याने फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दिली आहे.

नाचण्याच्या वादातून प्राणघातक हल्ला

चिखलदरा परिसरामध्ये लग्नात नाचगाण्याच्या कारणावरून एका महिलेच्या मुलाशी संशयित श्रावण सावलकर (वय १८, रा. नागापूर) याने वाद घातला. विळ्याने वार करून हत्येचा प्रयत्न केला. असा आरोप जखमी युवकाच्या आईने तक्रारीत केला. चिखलदरा पोलिसांनी संशयित श्रावणविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.