मुंबईतून निघाली ताडोबा एक्‍सप्रेस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

नागपूर - पर्यटकांच्या सुविधेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते काझीपेठदरम्यान  साप्ताहिक ताडोबा एक्‍सप्रेस ही सुरू झाली. सोमवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबई हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ही रेल्वे चंद्रपूरच्या दिशेने निघाली.

व्याघ्र दर्शनासाठी ताडोबासह विदर्भातील अन्य व्याघ्र प्रकल्पांना भेटी देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी ही रेल्वेगाडी उपयुक्त ठरणार आहे. ताडोबा एक्‍स्प्रेस दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनन्स येथून सकाळी ११.३० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता काझीपेठला पोचेल.

हीच गाडी प्रत्येक शनिवारी सायंकाळी ५.४५ वाजता काझीपेठहून सुटेल. दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोचेल. एकूण १७ डब्यांच्या ताडोबा एक्‍स्प्रेसला सेंकड एसीचा १, थर्ड एसीचे २, स्लीपर क्‍लासचे ८, जनरल सेकंड क्‍लासचे चार, जनरल तसेच गार्ड ब्रेकव्हॅन डबे राहतील. या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, नगरसोल, लासूर, औरंगाबाद, जालना, परभणी, पूर्णा जंक्‍शन, हुजूर साहिब नांदेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद, पिंपळखुटी, वणी, माजरी खदान, चंद्रपूर, बल्लारशहा, सिरपूर, कागझनगर, बेलमपल्ली, मंचीरिअल, रामागुंडम, पेदापल्ली आणि  जमीलकुंटा येथे थांबे देण्यात आले आहेत. प्रारंभप्रसंगी आमदार मंगेश कुडाळकर, मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक ए. के. श्रीवास्तव, संजीव देशमुख उपस्थित होते.

Web Title: Mumbai Express was a Tadoba