मुंबई, पुण्यासाठी सुविधा स्पेशल  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

नागपूर  : दिवाळी आटोपताच कामाच्या ठिकाणी परतणाऱ्यांची रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी होणार आहे. ही बाब लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने नागपूरहून पुणे व मुंबईसाठी सुविधा स्पेशल रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

नागपूर  : दिवाळी आटोपताच कामाच्या ठिकाणी परतणाऱ्यांची रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी होणार आहे. ही बाब लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने नागपूरहून पुणे व मुंबईसाठी सुविधा स्पेशल रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 
82126 नागपूर-पुणे सुविधा स्पेशल ट्रेन बुधवारी (ता.30) रात्री 9.30 वाजता नागपूरहून रवाना होईल आणि गुरुवारी दुपारी 3.45 वाजता पुण्याला पोहचेल. या गाडीला अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामनगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. एकूण 19 डब्यांच्या या गाडीला सहा तृतीय श्रेणी वातानुकूलित, 12 स्लीपर आणि 4 जनरल डबे राहतील. 
02024 नागपूर- म ुंबई सुपरफास्ट स्पेशल ट्रेन सोमवारी (ता.28) रात्री 9.30 वाजता नागपूर स्थानकाहून रवाना होईल आणि मंगळवारी दुपारी 12.25 वाजता मुंबई स्थानक गाठले. या गाडीला अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामनगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, ईगतपूरी, कल्याण आणि दादर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. एकूण 19 डब्यांच्या या गाडीला एक द्वितीय श्रेणी वातानुकूलित, 13 स्लिपर आणि चार जनरल डबे राहतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai, Pune Facilities Special