गतविजेत्या विदर्भाला मुंबईचा दणका

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर : सलामी लढतीत आंध्र प्रदेशकडून चार गड्यांनी पराभूत झालेल्या गतविजेत्या विदर्भाला ग्वाल्हेर येथे सुरू असलेल्या विनू मंकड करंडक (एलिट "अ' आणि "ब' गट) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्याही सामन्यात मुंबईकडून 26 धावांनी पराभव पत्करावा लागला.
रूपसिंग स्टेडियमवर रविवारी खेळल्या गेलेल्या या लढतीत विदर्भाच्या फलंदाजांनी पुन्हा निराशा केली. गोलंदाजांनी मुंबईला 160 धावांमध्ये गुंडाळून सुरुवात चांगली केली. मंदार महालेने सर्वाधिक चार, फिरकीपटू रोहित दत्तात्रयने तीन व हर्ष दुबेने दोन गडी बाद केले. मुंबईकडून सलामीवीर सुवेद पारकरने 48 व प्रग्नेश कानपिल्लेवारने 36 धावांचे योगदान दिले.
161 धावांचे माफक लक्ष्य विदर्भाला पेलवले नाही. मुंबईच्या प्रभावी माऱ्यापुढे विदर्भाचा डाव अवघ्या 134 धावांत आटोपला. यष्टिरक्षक श्रीयोग पवार व प्रेरित अग्रवालने 77 धावांची भागीदारी करून विदर्भाच्या विजयासाठी प्रयत्न केले. परंतु, दोघेही लागोपाठ बाद होताच विदर्भाचा डाव संपुष्टात आला. श्रीयोगने सर्वाधिक 40 व प्रेरितने 38 धावांचे योगदान दिले. आर्यन बढेने चार आणि धनित राऊतने तीन गडी बाद करून मुंबईला विजय मिळवून दिला. विदर्भाचा तिसरा सामना नऊ ऑक्‍टोबरला महाराष्ट्रविरुद्ध खेळला जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक
मुंबई : 39 षट्‌कांत सर्वबाद 160 (सुवेद पारकर 48, प्रग्नेश कानपिल्लेवार 36, दिव्यांश 18, वरुण लवांदे 13, मंदार महाले 4-4, रोहित दत्तात्रय 3-37, हर्ष दुबे 2-35, प्रफुल्ल हिंगे 1-40).
विदर्भ : 44.1 षट्‌कांत सर्वबाद 134 (श्रीयोग पवार 40, प्रेरित अग्रवाल 38, शिवम देशमुख 13, आर्यन बढे 4-26, धनित राऊत 3-29, राजेश सरदार 2-35, हिमांशू 1-16).

विदर्भ-हिमाचल प्रदेश वनडे आज
नागपूर : पंजाबविरुद्ध काल पराभूत झालेल्या विदर्भाचा विजय हजारे करंडक (एलिट "अ' आणि "ब' गट) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील पाचवा साखळी सामना उद्या, सोमवारी हिमाचल प्रदेशविरुद्ध जीएसएफसी क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. बादफेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी विदर्भाला कोणत्याही परिस्थितीत या सामन्यात विजय आवश्‍यक आहे.
गुजरातमध्ये जोरदार पावसामुळे विदर्भाचे पहिले तिन्ही सामने रद्द झाले होते. त्यानंतर काल पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात विदर्भाला सात गड्यांनी दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर विदर्भाचे चार सामन्यांनंतर केवळ सहा गुण आहेत. हिमाचलनेही तितक्‍याच सामन्यात सहा गुणांची कमाई केलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com