थकबाकीदारांना शेवटचे अभय, अन्यथा लिलाव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

मनपाचा मालमत्ता कर थकविणाऱ्यांना इशारा
नागपूर - महापालिकेचा मालमत्ता कर थकविणाऱ्यांना शेवटची संधी दिली जाणार आहे. याकरिता नव्वद टक्के दंड माफीची अभय योजना राबविली जाणार आहे. यादरम्यान थकबाकी भरली नाही, तर मालमत्तेचा लिलाव करून नेहमीसाठी थकबाकीचा विषय समाप्त करण्याचा गंभीर इशारा महापौर नंदा जिचकार आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला.

महापालिकेला चालू आर्थिक वर्षातील 43 कोटी आणि जुनी थकबाकी 191 कोटी रुपये वसूल करायचे आहेत. जुन्या थकबाकीदारांसाठी 16 ते 21 मार्च या दरम्यान अभय योजना राबविली जाईल. यात थकबाकी भरल्यास 90 टक्के शास्ती माफ केली जाणार आहे. मात्र, मूळ रकमेमध्ये कुठलीही सवलत दिली जाणार नाही. यासाठी थकबाकीच्या कालावधीचे कुठलेही बंधन घालण्यात आले नाही. मात्र, थकबाकीदारांना प्रलंबित दावे, अपील मागे घ्यावे लागणार आहे सोबतच यापुढे थकबाकी ठेवणार नाही, असे हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे. सवलतीचा दुसरा टप्पा 24 ते 31 मार्च या दरम्यान राबविला जाणार आहे. यात 75 टक्के दंड माफ केला जाणार आहे. अनिधकृत बांधकाम केलेल्यांना दंडाची रक्कम माफ केली जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. या वेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, सत्तापक्षनेते संदीप जोशी उपस्थित होते.

232 हुकूमनामे प्रसिद्ध
आतापर्यंत महापालिकेतर्फे फक्त इशारे दिले जात होते. यामुळे आपले कोणी काही बिघडवू शकत नाही, असा थकबाकीदारांचा समज झाला होता. आता मात्र चलता है असे चालणार नाही. तब्बल 232 थकबाकीदारांचे प्रथमच हुकूमनामे प्रसिद्ध झाले आहेत. दिलेल्या कालावधीत थकबाकी भरली नाही तर मालमत्तेचा थेट लिलाव करून विषय बंद केला जाणार आहे. ही प्रक्रिया वर्षभर सुरू ठेवली जाईल. यामुळे थकबाकीतून कोणाची सुटका होणार नाही, असा इशारा आयुक्तांनी दिला.

Web Title: municipal arning to arrears