महापालिकेने थकविले 160 कोटी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

आरक्षणात होणार कपात? 
महापालिकेकडे सुमारे अडीचशे एमएलडी पाण्याचा हिशेबच नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाने महापालिकेच्या आरक्षणात कपात करण्याची सूचना केली आहे. याशिवाय महापालिका गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर करीत असल्याचे जलसंपदा व विभागाचे म्हणणे आहे. 

नागपूर - महापालिकेने धरणातून पाणी वापरासाठी आकारले जाणारे 160 कोटी थकविले आहे. जलसंपदा विभागासोबतचा करार संपल्यानंरही दोन वर्षांपासून पेंच धरणातील पाण्याचा वापर करीत असल्याचे उघडकीस आले आहे. जलसंपत्ती प्राधिकरणाने नागपूर महापालिकेसह धरणांमधील पाणी वापर करणाऱ्या सर्वच घटकांना थकबाकीसह कराराची अद्यावत स्थिती सहा आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 

पैसे न भरता तसेच कराराचे नूतनीकरण न करता राज्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर महानगरपालिका, ग्राम पंचायत व उद्योग करीत आहेत. यामुळे धरणांची देखभाल दुरुस्ती व व्यवस्थापनावर विपरित परिणाम होत आहे. प्राधिकरणाने समोर आलेल्या अनेक प्रकरणातून ही बाब उघडकीस आल्याने उपरोक्त निर्देश दिले आहे. यामुळे धरणातील पाण्याचे पैसे न भरता व मनमानी पद्धतीने करार न करता पाणी वापरणाऱ्या घटकांवर चपराक बसणार आहे. 

रामटेकचे माजी आमदार आशीष जयस्वालविरुद्ध मनपाच्या याचिकेवर जलसंपत्ती प्राधिकरणात सुनावणी सुरू आहे. या आदेशामुळे आता नागपूर मनपाचेही पितळे उघडे पडणार आहे. प्राधिकरणाच्या निर्देशानुसार दोन जुलैपर्यंत सर्वांनी शपथपत्र दाखल करायचे आहे. पुढील सुनावणी 13 जुलैला होईल. 

आरक्षणात होणार कपात? 
महापालिकेकडे सुमारे अडीचशे एमएलडी पाण्याचा हिशेबच नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाने महापालिकेच्या आरक्षणात कपात करण्याची सूचना केली आहे. याशिवाय महापालिका गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर करीत असल्याचे जलसंपदा व विभागाचे म्हणणे आहे. 

थकबाकी 160 कोटींची 
करार संपला - 2016 ला 
रोजची उचल - 520 एमएलडी 

Web Title: Municipal corporation exhausted 160 crores