डुक्‍कर पकड मोहिमेवर मनपा ठाम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

नागपूर : डुकरे पकडणाऱ्या पथकावर मालकांनी हल्ला केल्यानंतरही कारवाईसाठी मनपा ठाम आहे. डुक्‍कर पकडण्याची कारवाई कुठल्याही परिस्थितीत थांबविता येणार नाही, असे एका अधिकाऱ्याने नमूद केले. या कारवाईसाठी मनपाचे अतिरिक्त राम जोशी यांनी आज सायंकाळी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेतली. दरम्यान, डुकरे पकडणाऱ्या पथकावर हल्ला करणाऱ्या 14 जणांना अटक करून त्यांना कोठडीत डांबण्यात आले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी झोनमधील जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांच्या तक्रारीवरून डुकरांवर कारवाई करण्याचे निर्देश मनपाला दिले होते. त्यामुळे मनपाने डुकरे पकडण्यासाठी यापूर्वी मोहीम सुरू केली. मात्र, काही दिवसांमध्येच ती बंद पडली. आता सोमवारपासून तमिळनाडू येथील पथक आणून महापालिकेने पुन्हा मोहीम सुरू केली. पहिल्याच दिवशी सोमवारी 40 डुकरे पकडली. परंतु, डुकरे पकडणाऱ्या पथकाला डुकरांच्या मालकांचा रोष सहन करावा लागला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी जरीपटका परिसरात डुकरे पकडणाऱ्या पथकावर मालकांनी हल्ला केला. यात पथकातील पाच कर्मचारी जखमी झाले. याशिवाय जमावाने मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या वाहनावर दगडफेक केली. याप्रकरणी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवून 14 जणांना अटक केली. आज चौथ्या दिवशी पथकातील मारहाण करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदणी आदी कामामुळे डुकरे पकडण्याच्या मोहिमेला "ब्रेक' लागला. पोलिसांच्या सहकार्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. त्यामुळे ही कारवाई सुरू राहणार असल्याचे डॉ. महल्ले यांनी नमूद केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation still firm on Pig capchering design