प्लॅस्टिकमुक्त धम्मचक्र प्रवर्तनदिनासाठी मनपाचा निर्धार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

नागपूर, ता. 7 ः प्लॅस्टिकमुक्त शहराकडे वाटचालीचा वसा घेतलेल्या महापालिकेने यंदा प्लॅस्टिकमुक्त धम्मचक्र प्रवर्तनदिन साजरा करण्याचा निर्धार केला आहे. दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो बौद्ध अनुयायी दाखल होणार आहेत. धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या मुख्य सोहळ्यात लाखो अनुयायी मंगळवारी प्लॅस्टिकमुक्तीची शपथ घेणार आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवरून अनुयायांना बौद्ध धम्माची वाट दाखवून नवी क्रांती घडवून आणली होती. त्याच क्रांतिभूमीतून प्लॅस्टिकमुक्तीची क्रांती घडणार आहे. महापालिकेच्या "सिंगल यूज प्लॅस्टिक मुक्ती' अभियानाद्वारे धम्मचक्र प्रवर्तनदिनी जनजागृती केली जाणार आहे. परिसरात प्लॅस्टिकमुक्तीबाबत जनजागृती करणारे फलकही लावण्यात आले आहे. धम्मचक्र प्रवर्तनदिन मुख्य समारंभ व दीक्षाभूमी परिसरात असलेल्या डिजिटल स्क्रीनवरही प्लॅस्टिकमुक्ती व पोलिस आणि मनपा नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक दर्शविण्यात आले आहेत. परिसरात स्वच्छतेसाठी मनपाचे कर्मचारी अविरत सेवा देत असून, मनपातर्फे आरोग्य सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशाच्या विविध भागातून येणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी महापालिकेतर्फे उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची आयुक्तांनी पाहणी केली. अनुयायांना कोणताही त्रास होऊ नये, परिसरात स्वच्छता, विद्युत व्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी आदी व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली. दीक्षाभूमीवर सुविधांसाठी मनपाच्या सर्व विभागाने व त्यांच्या चमूने जबाबदारीने कर्तव्य पार पाडून नागरिकांना सुविधा द्यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal determination for Plastic Free Dhamma Chakra Day