मनपाला लवकरच नवीन आयुक्त

Nagpur-Municipal
Nagpur-Municipal

नागपूर - महापालिका आणि सुधार प्रन्यासचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. शहराच्या विकासासाठी हे चांगले नाही. त्यामुळे लवकरच महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अमरावतीचे जिल्हाधिकारी बांगर नागपूरमध्ये येणार असल्याची चर्चा आहे.

महापालिका आयुक्त वीरेंद्रकुमार सिंग दीड महिन्यांपासून रजेवर आहेत. सुधार प्रन्यासचे सभापतिपदही रिक्त आहे. येथील जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला आहे. आयुक्‍तांची नागपूरमध्ये येण्याची इच्छा नाही. त्यांनी रजा वाढवून घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शहरात प्रमुख अधिकारी नसल्याने भाजपवर टीकाही होत आहे. याबाबत विचारणा केली असता महानगरपालिकेला लवकर नवीन आयुक्त मिळतील, असे त्यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनानंतर नवीन आयुक्त रुजू होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. 

दुसरीकडे नागपूरचे माजी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या नावाची अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे. वीरेंद्र सिंग यांची वर्षभरापूर्वी महानगरपालिका आयुक्तपदावर नियुक्त झाली होती. अल्पावधीतच सत्ताधाऱ्यांसोबत त्यांचे खटके उडण्यास सुरुवात झाली. महानगरपालिकेला त्यांनी आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. सत्ताधाऱ्यांच्या अर्थसंकल्पाला कात्री लावली. अनेक निर्णय फिरवले. लेटलतिफांना निलंबित केले. त्यात सहायक आयुक्तांचाही समावेश आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी पटत नसल्याने रजेवर गेल्यानंतर ते परतलेच नाही. त्यांनी बदलीची विनंतीही केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com