महापालिका, नासुप्र घेणार जुन्या पाचशेच्या नोटा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

नागपूर - पेट्रोल पंप व विमानतळावर पाचशेच्या जुन्या नोटा खपविण्यासाठी शुक्रवारी शेवटची संधी होती. मात्र, नागरिकांना मालमत्ता, पाणी कर व विकास शुल्कासाठी जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारण्यास महापालिका व नासुप्रने 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देऊन जुन्या नोटा खपविण्याची एक संधी दिली. केंद्र सरकारने जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी वेळोवेळी कालावधी वाढविला. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता, पाणी कराच्या माध्यमातून तीस कोटींवर रुपये जमा झाले. नासुप्रमध्येही नागरिकांनी विकास शुल्क भरण्यासाठी रांग लावली.

नागपूर - पेट्रोल पंप व विमानतळावर पाचशेच्या जुन्या नोटा खपविण्यासाठी शुक्रवारी शेवटची संधी होती. मात्र, नागरिकांना मालमत्ता, पाणी कर व विकास शुल्कासाठी जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारण्यास महापालिका व नासुप्रने 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देऊन जुन्या नोटा खपविण्याची एक संधी दिली. केंद्र सरकारने जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी वेळोवेळी कालावधी वाढविला. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता, पाणी कराच्या माध्यमातून तीस कोटींवर रुपये जमा झाले. नासुप्रमध्येही नागरिकांनी विकास शुल्क भरण्यासाठी रांग लावली. आता केंद्र सरकारच्या सूचनेनुसार नगर विकास विभागाने परिपत्रक काढून पाचशेच्या जुन्या नोटा 15 डिसेंबरपर्यंत स्वीकारण्यासंदर्भात महापालिकेला सूचना केल्या आहेत. ओसीडब्ल्यूनेही पाणी करासाठी जुन्या पाचशेच्या नोटा 15 डिसेंबरपर्यंत स्वीकारण्यात येईल, असे कळविले आहे. नागपूर सुधार प्रन्यासनेही विकास शुल्क जुन्या पाचशेच्या नोटांसह स्वीकारण्यात येईल, असे कळविले आहे. एवढेच नव्हे आता पन्नास हजारांवर विकास शुल्कही नासुप्रच्या कार्यालयात भरता येणार आहे. महापालिकेच्या दहाही झोनमध्ये मालमत्ता कर स्वीकारला जाईल.

Web Title: Municipal, not to take old currency notes of five hundred