घंटागाड्यांवर राहणार नगरप्रशासनाचा वॉच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

यवतमाळ : "स्वच्छ व सुंदर शहर' म्हणून यवतमाळ शहराची ओळख आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने आधुनिक घंटागाड्यांची खरेदी केली आहे. या गाड्या रोज शहरातील सर्वच वॉर्डांतून फिरतात. या गाड्या रोज आल्या की नाही, याकरिता घराला ओळख देण्यात आलेली आहे. कोणत्या वॉर्डात गाड्या आल्या अथवा नाही, यावर स्थानिक प्रशासनाचा वॉच राहणार आहे.

यवतमाळ शहरातील नागरिकांना सर्वच पायाभूत सुविधांसह "स्वच्छ व सुंदर शहर' देण्याचा विडा प्रशासनाने उचला आहे. याकरिता प्रशासनाकडून लाखो रुपये खर्चसुद्धा करण्यात येत आहे. नव्याने नगरपालिका प्रशासनाने आधुनिक घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. प्रत्येक वॉर्डात या गाड्या रोज सकाळी जातात. या गाड्या रोज कचरा घेण्यासाठी येतात की नाही? याकरिता प्रशासनाने प्रत्येक घराला ओळख दिली असून, त्या ठिकाणी कार्ड लावण्यात आले आहेत. या कार्डाचा फोटो किंवा स्कॅन करून संबंधित कर्मचारी घेणार आहे. त्यामुळे प्रशासनाला कोणत्या वॉर्डात कचरा गाडी गेली किंवा नाही, याची माहिती मिळणार आहे. हे कॉर्ड लावण्याकरिता जवळपास 40 जणांकडे काम दिलेले असून, शहरातील सात हजार घरांना आतापर्यंत कार्ड लावण्यात आले आहे. लवकरच या कार्डच्या माध्यमातून कचरा गाडी वॉर्डात पोहोचली की नाही, याची प्रशासन माहिती घेणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipalty watch the Ghantagadi