दगडाने ठेचून युवकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

आखाडा बाळापूर (जि. अकोला) - आखाडा बाळापूर येथील एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार शनिवारी (ता. 24) उघडकीस आला. पाटबंधारे खात्याच्या कार्यालयाजवळ खदाणीत आढळलेल्या मृतदेहाच्या जवळ लिंबू, मद्य व हळद अशा वस्तू आढळल्याने हा प्रकार नरबळीचा असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आखाडा बाळापूर येथील सराफा व्यवसायिक सुरेश परशुराम जाधव यांचे "पाटील ज्वेलर्स' नावाचे सोन्या- चांदीचे दुकान आहे. त्यांचा मेहुणा भोजलिंग प्रताप पाटील (वय 26, रा. घोटी, ता. खानापूर, जि. सांगली) हा येथे काम करीत असे. शुक्रवारी (ता. 23) सायंकाळपासून तो दुचाकीसह बेपत्ता झाला होता. याबाबतची तक्रार सुरेश परशुराम जाधव यांनी बाळापूर पोलिस ठाण्यात दिली होती. नातेवाइकांकडे शोधाशोध केली असता भोजलिंगची दुचाकी कार्यकारी अभियंता कार्यालयाच्या फाटकाजवळ सापडली. परिसरात पाहणी केली असता खदानीत झाडाझुडपांत भोजलिंगचा रक्‍तबंबाळ व नग्नावस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेहाचा पंचनामा करताना पोलिसांना मृतदेहाजवळ लिंबू, हळद, मद्याच्या बाटल्या, पाण्याची बाटली व भोजलिंगच्या शरीरावर शस्त्रांनी वार केल्याचे व डोके दगडाने ठेचण्यात आल्याचे दिसून आले. या प्रकाराने ही घटना नबरळी असल्याची चर्चा येथे आहे.

Web Title: murder in akhada balapur