प्रियकराच्या मदतीने केला मुलाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

नागपूर - सून मनीषा आणि तिचा प्रियकर अरुण मिश्रा यांनी संगनमत करून अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा "कोल्ड ब्लडेड' खून केला. विम्याच्या 25 लाख रुपये मिळविण्यासाठी त्याला अपघाताचा देखावा निर्माण केला. तसेच एका पोलिस उपायुक्‍ताच्या मदतीने हत्याकांड दाबल्या जात असल्याचा आरोप पंकज अंभोरे याचे आईवडील चंद्रकांत अंभारे आणि संध्या चंद्रकांत अंभारे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

नागपूर - सून मनीषा आणि तिचा प्रियकर अरुण मिश्रा यांनी संगनमत करून अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा "कोल्ड ब्लडेड' खून केला. विम्याच्या 25 लाख रुपये मिळविण्यासाठी त्याला अपघाताचा देखावा निर्माण केला. तसेच एका पोलिस उपायुक्‍ताच्या मदतीने हत्याकांड दाबल्या जात असल्याचा आरोप पंकज अंभोरे याचे आईवडील चंद्रकांत अंभारे आणि संध्या चंद्रकांत अंभारे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

पंकज चंद्रकांत अंभारे (वय 32, रा. व्यंकटेश सिटी) हा 5 डिसेंबरच्या रात्री कारने जात असताना कामठी मार्गावर शिल्पा रोलिंग कंपनीसमोर जखमी अवस्थेत तो मनीषाला दिसला. तिने डॉक्‍टरला अपघात झाल्याचे सांगितले. तर नातेवाइकांना पंकज नाल्यात पडल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना पंकजने स्वत:च डोक्‍यात दगड मारून आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला. मनीषाच्या सांगण्यावरून पाचपावली पोलिसांनी प्रथम आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर मनीषाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला. मनीषाने आपल्या प्रियकरासह मिळून त्याचा खून केला असून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पंकजच्या आईवडिलांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत सागर जाधव, अविनाश जाधव, विक्की थोरात आदी नागरिक उपस्थित होते. 

आयुक्‍तांना दिले निवेदन 
पाचपावली पोलिसांनी आरोपींवर केवळ आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. अरुण मिश्राचे नातेवाईक पोलिस दलात आहेत. त्यांनी एका पोलिस उपायुक्‍त दर्जाचा अधिकाऱ्याची भेट घेऊन प्रकरण "सेटल' केले. अधिकाऱ्यांनीच खुनाचा गुन्हा दाखल करू नये, असा आदेश दिल्याने पाचपावलीचे तपास अधिकारी हतबल झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. त्यामुळे केवळ पोलिस आयुक्‍त डॉ. बी. के. उपाध्याय हेच मदत करू शकतात. त्यामुळे त्यांची नातेवाइकांनी भेट घेऊन निवेदन दिले. आयुक्‍तांनीही निष्पक्ष चौकशीचे आदेश दिले आहेत. 

मनीषा-पंकजचे "जॉइंट अकाउंट' 
मनीषाने 1 डिसेंबरलाच पंजाब नॅशनल बॅंकेत जॉइंट अकाउंट काढले आहे. तसेच सहा महिन्यांपूर्वी पंकजचा 25 लाखांचा अपघाती विमाही काढला आहे. त्यामुळे अरुण आणि मनीषाला विम्याची रक्‍कम मिळविण्यासाठी पंकजचा खून करून अपघात झाल्याचा देखावा निर्माण केला. परंतु, पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम, पीएसआय इंगळे यांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी दमदाटी करून प्रकरण न वाढविण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप पंकजचे मामा अविनाश जाधव यांनी केला. 

Web Title: Murder of the boy with the help of the boyfriend

टॅग्स