विवेक पालटकर देणार आज हत्याकांडाचा ‘डेमो’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

नागपूर - जावई आणि बहिणीसह पाच जणांची निर्घृण हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक पालटकरला रविवारी दुपारी कमलाकर पवनकर यांच्या घरी नेण्यात येईल. तेथे आरोपी विवेककडून हत्याकांडाचा ‘डेमो’ करून घेण्यात येईल. हत्याकांडाच्या घटनाक्रमाच्या नोंदी पोलिस घेणार असून न्यायालयीन प्रक्रियेत या नोंदी पोलिसांना महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. 

गुन्हे शाखेच्या किरण चौगुले यांचे पथक आरोपी विवेकला शोधण्यासाठी पंजाबमधील लुधियाना शहरात गेले होते. एका कंपनीत चौकीदाराची नोकरीही मिळवली होती. एका मजुरासोबत राहत असतानाच त्याचा मोबाईल चोरीला गेला. तो मोबाईल तेथील एका युवकाने स्वतःचे सीमकार्ड टाकून वापरला.

त्यावरून गुन्हे शाखा पोलिस आणि उपायुक्‍त नीलेश भरणे यांच्या पथकाला माहिती मिळाली. दोन्ही पथके पंजाबला रवाना झाली. एपीआय चौगुले यांच्या पथकाला माहिती मिळताच त्यांनी लुधियानातील सैनिवाल परिसर गाठला. तेथे जवळपास दीड हजार मजूर बांधकामावर काम करीत होते. तेथे पंजाब पोलिस दलातील एका हवालदाराच्या मदतीने पोलिस आरोपी विवेकपर्यंत पोहोचले.

विवेकला रविवारी दुपारी आराधनानगरातील हत्याकांडाच्या घटनास्थळी नेण्यात येईल. तेथे हत्याकांड कसे घडवले, याचे प्रात्यक्षिक विवेककडून पोलिस घेतील. तेथून त्याला दिघोरीतील चामट लॉनजवळील खोलीवर नेण्यात येईल. खोलीची पुन्हा झडती घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Web Title: murder case demo by vivek palatkar