चंद्रपुरात भर रस्त्यात भावांची निर्घृण हत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

आरोपीने मृतकांना भर रस्त्यात ठार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. हत्येमागील कारण अस्पष्ट आहे, आरोपी फरार असून आरोपीचा शोध रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक कोळी व त्यांची टीम करीत आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बायपास रोडवरील अष्टभुजा परिसरातील रमाबाई नगर येथे दोन भावांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनू साव (वय 28) आणि गुड्डू साव (वय 32) अशी मृतकांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिस घटनास्थळी पोचले. मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहे.

आरोपीने मृतकांना भर रस्त्यात ठार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. हत्येमागील कारण अस्पष्ट आहे, आरोपी फरार असून आरोपीचा शोध रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक कोळी व त्यांची टीम करीत आहे.

Web Title: murder in Chandrapur