जुन्या वैमनस्यातूनच हत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

टेकाडी - गोंडेगाव उपसरपंच विनोद सोमकुंवरची हत्या जुन्या वैमनस्यातून झाली असून, हत्येप्रकरणी रविवारी तीन आरोपींना अटक करण्यात आली. हत्येचा मुख्य सूत्रधार निषेध महादेव वासनिक (३१), सोनू ऊर्फ बाबा ऊर्फ रामू हिरामण वहाणे (३२) व नितीन माणिक देशमुख (३३) तिघेही राहणार नागपूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तीन आरोपी फरार आहेत.

टेकाडी - गोंडेगाव उपसरपंच विनोद सोमकुंवरची हत्या जुन्या वैमनस्यातून झाली असून, हत्येप्रकरणी रविवारी तीन आरोपींना अटक करण्यात आली. हत्येचा मुख्य सूत्रधार निषेध महादेव वासनिक (३१), सोनू ऊर्फ बाबा ऊर्फ रामू हिरामण वहाणे (३२) व नितीन माणिक देशमुख (३३) तिघेही राहणार नागपूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तीन आरोपी फरार आहेत.

राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी विनोदची तलवारीने गळा चिरून हत्या करण्यात आली. हत्येच्या पूर्व तयारीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. यानंतर विनोदच्या कोळसा व्यवसायातील पार्टनर भुजंग महल्लेला विचारपूस केली. तसेच कोळसा व्यवसायातील जुना सहपाठी संदेश लांजेवारला संशयाच्या आधारावर ताब्यात घेऊन कसून विचारणा केली असता तपासाला दिशा मिळाली. हत्याकांडाची सूत्रे नागपूरवरून जुळल्याचा उलगडा झाला. तिन्ही आरोपींना रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास खरबी चौक, उमरेड रिंग रोड, नागपूर येथून हत्याकांडात  वापरलेल्या ग्रे रंगाच्या कारसह अटक केली.

टीप दिल्याची कबुली भोवली
निषेध बिटकॉईन प्रकरणात कोट्यवधींची हेराफेरी करून गोंडेगाव येथे काही काळ वास्तव्यास होता. संदेशच्या माध्यमातून निषेधची विनोदशी ओळख झाली. निषेधच्या व्यवसायात विनोदची हात घालण्याची इच्छा धुडकावल्याने दोघांमध्ये द्वंद झाले होते. कुटुंबासमक्ष निषेधच्या  काळजावर विनोदने तलवार ठेवून दम दिला होता. बीटकॉईनप्रकरणी निषेधला नागपूर येथून गुन्हे शाखेने अटक केली होती. निषेधची टीप दिल्याचे विनोद कुणाकडे बोलला होता. ही माहिती  निषेधला समजली. शिक्षा संपवून येताच त्याने विनोदचा काटा काढला.

एक दुबईला पळाला
विवेकच्या हत्येनंतर सैरावैरा पळालेल्या सहा आरोपींपैकी एका आरोपीला नागपूर विमानतळावर सोडण्यात आले होते. त्याने संध्याकाळी फ्लाईटने दुबईला पळ काढल्याची विश्‍वसनीय माहिती आहे.

हवी होती बादशाहत
विवेक व संदेश एकत्रित कोळशाची अवैध विक्री करायचे. निषेधचीदेखील दोघांशी मैत्री झाली. विवेकने टेकाडी येथील महल्लेसोबत पार्टनरशिप सुरू केली. पार्टनरशिप मागण्यावरून वाद झाल्याने विवेकने संदेशला व्यवसायातून बाहेर केले. कोळसा व्यवसायातील बादशाहत हातात ठेवण्यासाठी संदेशने निषेधसोबत हातमिळवणी केल्याचा संशय बळावत चाललेला आहे.

Web Title: murder crime