नागपुरात दोन हजार रुपयांसाठी मित्राचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

नागपूर : दोन हजार रुपयांच्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्‍यावर लोखंडी रॉडने वार करून त्याचा खून केला. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत आज, गुरुवारी उघडकीस आली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

नागपूर : दोन हजार रुपयांच्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्‍यावर लोखंडी रॉडने वार करून त्याचा खून केला. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत आज, गुरुवारी उघडकीस आली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
रोशन राजेश नगराळे (वय 19, रा. लोखंडेनगर) असे मृताचे नाव आहे. आरोपी अजिंक्‍य राजेश तेलगोटे (वय 19, रा. रमाईनगर, जयताळा) आणि रोशन नगराळे मित्र होते. त्यांना दारू पिण्याचे व्यसन होते. दोघेही बेरोजगार असून दिवसभर परिसरात दादागिरी करीत फिरायचे. रोशनने आरोपी अजिंक्‍यला अनेकदा पाचशे, हजार रुपये दिले होते. त्यामुळे अजिंक्‍यकडे रोशनचे दोन हजार रुपये उधार होते. त्या पैशांची मागणी रोशन करायचा. पैसे परत करण्यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाला. काही दिवसांपूर्वी रोशनने आरोपीला शिविगाळ करून मारहाण केली होती. याचा राग आरोपी अजिंक्‍यच्या मनात होता. गेल्या 9 सप्टेंबरला रात्री 11 वाजताच्या सुमारास आरोपीने रोशनला जयताळा परिसरातील माऊली मंदिरजवळ बोलावून घेतले. चर्चेदरम्यान पुन्हा पैशाचा वाद सुरू झाला. तेथून ते दोघेही राज्य राखीव पोलीस मुख्यालयाच्या पाठीमागील भिंतीला लागून असलेल्या झुडपाजवळ थांबले. तेथे एका झुडपातून आरोपीने लोखंडी रॉड काढून रोशनच्या डोक्‍यात मारला. त्यानंतर विटांनी चेहरा ठेचून काढला. खुनाची माहिती कुणाला होऊ नये म्हणून अजिंक्‍यने रोशनचा मृतदेह झुडपातील एका खड्ड्यात लपवून ठेवला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a friend in Nagpur for two thousand rupees