आपसी वादातून मित्राचा खून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

वणी (जि. यवतमाळ) : शहराला लागून असलेल्या चिखलगाव येथील किशोर मोटार मेकॅनिकच्या बाजूला मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणाच्या खुनात झाले. मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची फिर्याद नोंदविल्यानंतर वणी पोलिसांनी दोन तासांत तीन आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले. 

येथील मेघदूत कॉलनीमधील श्रीकांत अरविंद ठाकरे (वय 36), ज्ञानदीप ऊर्फ सोनू निमसटकर (वय 29) व संदेश प्रशांत तिखट (दोघेही रा. बोधेनगर, वणी) या मित्रांमध्ये बुधवारी (ता.9) रात्री किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन श्रीकांत ठाकरे जबर जखमी झाला. त्याला पहाटे पाचच्या सुमारास वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन तासांत या घटनेतील संशयित आरोपी ज्ञानदीप निमसटकर, संदेश तिखट व स्वप्नील धुर्वे यांना अटक केली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a friend through a mutual dispute